माहिती आणि प्रसारण मंत्रालय
55 व्या इफ्फीमध्ये एका आकर्षक मास्टरक्लासमध्ये अँथन म्युलरने बारकोचे एचडीआर तंत्रज्ञान समजावून सांगितले
‘आपल्याकडे 3 प्रकारची रणनीती आहे: चित्रपट पाहणाऱ्यांना शिक्षित करणे, पोस्ट-प्रॉडक्शन हाऊसेसना आकर्षित करणे आणि प्रदर्शन हॉलना प्रोत्साहन देणे’: अँथन मुलर
बारकोचे एचडीआर उत्तम कॉन्ट्रास्ट आणि असाधारण एकरूपता प्रदान करते
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2024
कला अकादमी, गोवा येथे 55 व्या इफ्फी मध्ये प्रतिनिधींच्या पाचव्या दिवसाची सुरुवात एचडीआर तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीने झाली. ‘लेझर फॉर पोस्ट-प्रॉडक्शन अँड इव्होल्युशन टू एचडीआर’ वरील आजच्या पहिल्या मास्टरक्लासमध्ये बारको सिनेमाचे जागतिक रणनिती संचालक अँथन मुलर यांनी बारकोच्या पेटंट एचडीआर तंत्रज्ञानासह पोस्ट-प्रॉडक्शन आणि प्रोजेक्शनच्या भवितव्याबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली.
सुरुवातीलाच अँथनने सिनेमातील एचडीआर तंत्रज्ञानाच्या परिणामांबाबत ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि त्यानंतर या गूढ विषयावर अर्ध्या तासाचे रंगतदार वैचारिक सत्र आयोजित करण्यात आले ज्यात अगदी सोप्या पद्धतीने ते समजावण्यात आले.
एचडी युगात, सर्व तंत्रज्ञ एलईडी, क्यूएलईडी स्क्रीनिंगच्या संपर्कात आहेत; अगदी आय-फोनद्वारे किंवा, आय-पॅड एचडीआर स्क्रीनची पकड देखील चांगली आहे. मात्र सिनेमा प्रोजेक्शनच्या क्षेत्रात, किंवा अगदी लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामात एचडीआर ही एक क्रांतिकारी संकल्पना आहे. अँथनच्या आकडेवारीनुसार, जगभरातील 99% पोस्ट-प्रॉडक्शन हाऊसेस अजूनही लॅम्प -बेस्ड सेटअप वापरतात. बारकोसह, अँथनचे उद्दिष्ट ही परिस्थिती बदलण्याचे आहे आणि त्यासाठी त्यांच्या मते, “आपल्याकडे 3 प्रकारची रणनीती आहे: चित्रपट पाहणाऱ्यांना शिक्षित करणे , पोस्ट-प्रॉडक्शन हाऊसेसना आकर्षित करणे आणि प्रदर्शन हॉलना प्रोत्साहन देणे. ”
संपूर्ण मास्टरक्लास दरम्यान अँथनने एसडीआर पेक्षा एचडीआर वापरण्याचे फायदे प्रामुख्याने अधोरेखित केले आणि उदाहरणे, दाखले आणि आकडेवारीसह आपले दावे सिद्ध केले. त्याच्यासोबत लॅम्प बेस्ड प्रोजेक्शनपासून ते डिजिटल प्रोजेक्शन टेक्नॉलॉजीच्या लेनमधून लेझर आधारित एचडीआरपर्यंतचा प्रवास करणे हा प्रेक्षकांसाठी एक खिळवून ठेवणारा अनुभव होता.
चित्रपट निर्मिती तसेच चित्रपटांचा अनुभव यांच्या विश्वात सध्याच्या एसडीआर तंत्रज्ञानाकडून लेसर एचडीआर तंत्रज्ञानाकडे स्थित्यंतर ही एक प्रचंड झेप असणार आहे. आणि अँथनने केलेले दावे खरे मानले तर हे नवे तंत्रज्ञान अत्यंत किफायतशीर देखील असणार आहे. अँथन म्हणाला की तो बार्कोच्या एचडीआर तंत्रज्ञानाच्या सतत संपर्कात असल्यामुळे आता त्याची आवड बदलली आहे.आणि तो आता त्याच्या घरातील स्क्रीनिंग प्रणाली लेसर आधारित एचडीआर तंत्रज्ञानासह अद्ययावत करणार आहे.
येत्या काळात चित्रपटाच्या प्रेक्षकांना तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती देण्याची गरज आहे हे तथ्य अँथनने मान्य केले. बार्को कंपनीने यापूर्वीच त्या दिशेने काम सुरु केले असून पहिल्यांदा अमेरिकेत आणि नंतर गेल्या आठवड्यात लंडन येथे या तंत्रज्ञानाची सुरुवात केली आहे. तसेच कंपनीच्या सेट अप सह सहा प्रकल्प निर्माण करून प्रक्षेपित केले जातील.
कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अँथनने स्पष्टपणे नमूद केले की अधिक उत्तम वर्गीकरण आणि कॉन्ट्रास्ट सह बार्को तंत्रज्ञान केवळ अधिक लवचिकता प्रदान करते. याचा अर्थ येणाऱ्या पिढ्या कृष्ण-धवल प्रकारातील अभिजात चित्रपटांप्रती कमी प्रमाणात आकर्षित व्हाव्यात याला उत्तेजन देण्याचा हेतू आहे असे नाही. अधिक गडद असा काळा रंग आणि अधिक उज्ज्वल पांढरा रंग इतकेच पर्याय देण्यापेक्षा हे तंत्रज्ञान येत्या काळात मोनोक्रोम प्रकारच्या चित्रपटांमध्ये अधिक तल्लीन होऊन त्यांचा आनंद लुटण्याचा उत्तम अनुभव देतील.
अँथनकडून सर्वोत्तम प्रकारचा कॉन्ट्रास्ट तसेच अतुलनीय एकरुपता यांचा अनुभव मिळवण्याचे वचन घेत चित्रपट रसिक बार्कोच्या लेसर एचडीआर तंत्रज्ञानासह एका अधिक तेजस्वी भविष्याची स्वप्ने रंगवत सभागारातून बाहेर पडले.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sushma/Sanjana/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076659)
Visitor Counter : 12