माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 5

लोकल इज ग्लोबल ! व्यापक स्वीकार असलेल्या कथा जागतिक स्तरावर प्रेक्षकांची मने जिंकतील, 55 व्या इफ्फी पॅनेल चर्चेत चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचे एकमत


वाटचालीतल्या कथा -स्टोरीज दॅट ट्रॅव्हल’ या विषयावरील चर्चासत्रात जागतिक प्रेक्षकांबरोबर संबंध निर्माण करण्याच्या आवश्यकतेकडे लक्ष वेधण्यात आले

#IFFIWood, 23 नोव्‍हेंबर 2024

 

मानवी भावना सार्वत्रिक आहेत आणि सिनेमा हे भाषा निरपेक्ष माध्यम असल्यामुळे जगभरातील लोकांशी जोडले जाऊ शकते. कथा आणि कथाकथनाच्या कलेमध्ये देश प्रदेशाच्या सीमा, भाषा आणि संस्कृती ओलांडण्याची ताकद आहे का, यावर चित्रपटाचा पोहोच अवलंबून असतो असे मत पणजी येथील कला अकादमी येथे चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. 

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  चित्रपट प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘वाटचालीतल्या कहाण्या -स्टोरीज दॅट ट्रॅव्हल’ या विषयावर पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली होती.

प्रतिष्ठित पॅनेलमध्ये भारतीय वंशाचे ब्रिटीश पारशी लेखक, नाटककार, पटकथा लेखक फारुख धोंडी, स्पॅनिश निर्माते अण्णा सौरा, प्रख्यात अभिनेते तनिष्टा चॅटर्जी, प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माती वाणी त्रिपाठी टिकू आणि इंग्रजी माहितीपट दिग्दर्शक लुसी वॉकर यांचा समावेश होता. भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते बॉबी बेदी यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले. यामध्ये कथा-कथनाच्या बारकाव्यांवर  प्रकाश टाकण्यात आला. प्रदेश, देश किंवा संस्कृती नुसार असूनही सार्वत्रिक बनण्याची क्षमता या कथांमध्ये असते असे मत वक्त्यांनी या सत्रात मांडले. 

बॉबी बेदी यांनी सत्राची सुरुवात करताना सांगितले की भारत हा जागतिक स्तरावरील एक लोकप्रिय आणि मजबूत चित्रपट निर्मिती उद्योग आहे; परंतु भारतीय चित्रपट निर्माते समुदायापलिकडे जाऊन प्रेक्षकांचा विचार करत नाहीत आणि म्हणूनच ते अनेकदा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांशी जोडले जाऊ  शकत नाहीत.

माहितीपट निर्माते ल्युसी वॉकर यांचा  'माउंटन क्वीन: द समिट ऑफ लखपा  शेर्पा' या माहितीपटाने अलीकडेच इफ्फीसह विविध चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळवली असे सांगितले.

ल्युसी वॉकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की "कुणीतरी अशा लोकांबद्दल आणि प्राण्यांबद्दल चित्रपट बनवले पाहिजेत ज्यांची त्यांना काळजी आहे." त्यांना जगभरात  प्रवास करायला आवडते, मात्र पर्यटक म्हणून नाही, तर स्थानिक लोकांवर चित्रपट बनवण्यासाठी फिरायला आवडते असे त्यांनी सांगितले.

वाणी त्रिपाठी टिक्को म्हणाल्या, "वसुधैव कुटुंबकम्" हा भारताचा मंत्र आहे. भारत हा नेहमीच कथा कथनकारांची भूमी राहिला आहे आणि "कथावाचन" ही नेहमीच आपली परंपरा राहिली आहे. भारताबाहेरून आलेल्या कथा देखील देशात सांगितल्या जातात असे मत त्यांनी  व्यक्त केले. "शेवटी जगभर प्रवास केलेल्या कथांमध्ये सार्वत्रिकता आणि सांस्कृतिक बंध असतात", असे त्यांनी नमूद केले.

फारुख धोंडी यांनी मानवजातीमधील कथा-कथनाच्या इतिहासाबाबत सखोल निरीक्षण नोंदवले. “प्रत्येक जमात, प्रत्येक संस्कृतीच्या स्वतःच्या पौराणिक कथा असतात. तिथूनच कथा सुरू होते! पौराणिक कथा आपल्याला संस्कृतीच्या नैतिकतेबद्दल सांगतात. काही कथा वेगवेगळ्या देशात सांगितल्या जातात तर काही नाही सांगितल्या जात.” जगात सर्वच कथा प्रेक्षकांशी सारख्या प्रमाणात जोडल्या जात नाहीत असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केले की भारतीय शेतकरी आणि शहरी गरीबांबद्दलच्या राज कपूरच्या कथा रशियन  प्रेक्षकांना भावल्या होत्या. आणि कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि जवळपासच्या देशांमध्ये पुरस्कार देखील जिंकले होते, मात्र अमेरिका किंवा युरोपमध्ये तशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला  नाही. तर दुसरीकडे, सत्यजित रे यांच्या नाविन्यपूर्ण कथा  युरोप आणि अमेरिकेतील प्रेक्षकांशी जोडल्या गेल्या.

ते पुढे म्हणाले की, पुढच्या टप्प्यात जगात सर्वत्र अस्तित्त्वात असलेल्या आधुनिक वास्तवावरील कथा आल्या आणि स्लमडॉग मिलेनियर आणि सलाम बॉम्बे सारखे चित्रपट जगभरातील अनेकांशी जोडले गेले. ‘प्रेम सर्वांवर विजय मिळवते’ असा सार्वत्रिक संदेश देणारा मान्सून वेडिंग पाश्चात्य प्रेक्षकांशी जोडला गेला. अशाच प्रकारे, वेगळ्या भाषेत असूनही आणि वेगळ्या संस्कृतीत बसलेल्या बँडिट क्वीनने स्वतःच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एका महिलेच्या कथेने पाश्चिमात्य प्रेक्षकांना थक्क केले, असे फारुख धोंडी यांनी सांगितले.

प्रख्यात स्पॅनिश चित्रपट निर्माते कार्लोस सौरा यांची मुलगी ॲना सौरा म्हणाली की इंटरनेट युगात लोकांना जगभरातील सामग्री उपलब्ध आहे आणि म्हणूनच सर्व कथांना जागतिक प्रेक्षक आहेत. तिने या वस्तुस्थितीवर जोर दिला की “ मानव म्हणून आपले चित्रण केलेल्या कथा जगभर जोडल्या गेल्या आहेत”. या कथा जगभरातून कुठूनही असू शकतात, असे तिने सांगितले. ॲना सौरा यांनी आजच्या सिनेसृष्टी बद्द्ल बोलताना असे मत व्यक्त केले की चित्रपट महोत्सव आणि ओटीटीने माहितीपट आणि लघुपटांनाही एक व्यासपीठ दिले आहे आणि त्यामुळे सर्वांसाठी मोठी बाजारपेठ खुली झाली आहे.  ती म्हणाली की निर्माते आणि चित्रपट निर्मात्यांवर जगभरातील प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आहे. या संदर्भात ती म्हणाल्या की जगभरात प्रवास करू शकणाऱ्या आणि समजल्या जाऊ शकतील अशा काही संकल्पना आहेत आणि त्यासाठी भाषा हा अडथळा नाही.

प्रसिद्ध अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी यांनी जागतिक प्रेक्षकांवर गारुड करणाऱ्या कथांवरील चर्चेत कलाकाराचा दृष्टिकोन मांडला. त्यांनी सांगितले की भारतीय जनप्रेक्षक दूरचित्रवाणीस्नेही अधिक आहेत आणि सिनेमा त्यांच्यासाठी दुय्यम आहे. अभिनेत्रीने स्पष्ट केले की भारतीय चित्रपट आपल्या संस्कृतीप्रमाणेच तीव्र आणि उत्सवी आहेत, तर पश्चिमेत भावना अधिक सूक्ष्म पद्धतीने व्यक्त केल्या जातात. सांस्कृतिक बारकावेही देशानुसार बदलतात, अशी भर त्यांनी घातली.

तनिष्ठा चॅटर्जी यांनी भावना सार्वत्रिक असल्याचेही नमूद केले. "पण जेव्हा संकल्पना स्थानिक असते तेव्हा ती प्रवास करते", असे त्या म्हणाल्या. आपण काहीतरी सार्वत्रिक बनवण्याचा प्रयत्न करू नये, तर स्थानिक कथा सांगण्यावर भर द्यावा, असे अभिनेत्रीने कथन केले. "संस्कृती आणि भावनांची वैश्विक भाषा नेहमीच प्रवास करते."

बॉबी बेदी यांनी अवतारसारख्या चित्रपटांचा उल्लेख केला, ज्यामध्ये भारतातील स्थानिक कथेने जागतिक सुपर कथेचे रूप धारण केले होते. फारुख धोंडी यांनी आठवण करून दिली की अमेरिकन सुपर हिरो चित्रपटांनाही जागतिक प्रेक्षकवर्ग लाभतो. यावर बोलताना ल्युसी वॉकर यांनी सांगितले की, सुपरहिरो देखील स्थानिक व्यक्ती असतात जे प्रसंगोपात झळाळून उठतात.

सार्वत्रिक भावनिक मोहिनी असलेल्या स्थानिक कथा जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकून घेतील, या सर्वसाधारण टिप्पणीवर चर्चा संपली.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sushma/Nandini/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076537) Visitor Counter : 13