माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 5

55 व्या इफ्फी (IFFI) महोत्सवात ख्यातनाम ध्वनी आरेखनकार नकुल कामटे आणि एरिक होहेन यांच्याबरोबर 'द आर्ट अँड सायन्स ऑफ साउंड इन फिल्म' या विषयावरील सत्र


चित्रपटातील ध्वनी हा केवळ मोकळ्या जागा भरून काढत नाही, तर प्रेक्षकांना कथानकाबरोबर पुढे घेऊन जातो

कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला पर्याय देते, पण निर्णय घेत नाही, अथवा, सादरीकरणाची सत्यता स्पष्ट करत नाही, जो कथा कथनाचा महत्वाचा पैलू मूलतः मानवी आहे: नकुल कामटे

#IFFIWood, 22 नोव्‍हेंबर 2024

 

गोव्यामधील 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ख्यातनाम ध्वनी आरेखन (निर्मिती) कलाकार नकुल कामटे आणि एरिक होहेन यांनी साउंड  डिझाइनची (आरेखन)  कला आणि विज्ञान, याबद्दल आपले विचार मांडले. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते कामटे यांनी ध्वनी आरेखन केलेल्या लगान आणि दिल चाहता है यासारख्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवली आहे. दोन वेळा एमी पुरस्कार विजेते होहेन, द क्वीन्स गॅम्बिट आणि डीपवॉटर होरायझन या चित्रपटांसाठी ओळखले जातात.

दोन्ही तज्ञांनी ध्वनी तंत्रज्ञान, कथाकथनातील त्याची भूमिका आणि चित्रपट उद्योगातील ध्वनी डिझाइनचा विकसित होणारा परिप्रेक्ष, याबद्दलचा आपला दृष्टीकोन मांडला.

कामटे आणि होहेन या दोघांनी साउंड डिझाइनच्या बदलत्या स्वरूपावर मांडलेल्या विचारांनी सत्राची सुरुवात झाली. कामटे यांनी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे निर्माण होणारी आव्हाने आणि संधी यावर आपले विचार मांडले, तर होहेन यांनी ध्वनी निर्मितीमधील मानवी घटकाची अत्यावश्यक भूमिका विषद केली.  

या सत्रात उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा, विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय), ध्वनी डिझाइनवर पडणारा प्रभाव, या मुद्द्यावर चर्चा झाली.  होहेन म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता पर्याय उपलब्ध करते, पण निर्णय घेत नाही, अथवा, सादरीकरणाची सत्यता स्पष्ट करत नाही, जो कथा कथनाचा महत्वाचा पैलू आहे, आणि तो मूलतः मानवी आहे.”  कामटे यांनी या कल्पनेचा विस्तार केला आणि साउंड डिझाइनमध्ये मानवी निर्णयाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले.

गुंतागुंतीच्या ध्वनी संयोजानामध्ये साउंड डिझायनर्सना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, यावरही चर्चा झाली. होहेन यांनी स्पष्ट केले, “चित्रपटात ध्वनी हा घटक प्रेक्षकांवर अवाजवी प्रभाव पाडणारा नसावा, तर दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे, हे सूचित करणारा असावा, या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे.” कामटे यांनी सिनेमाच्या ध्वनिमध्ये आवश्यक तेवढाच लाऊडनेस कायम ठेवण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, “आजचे चित्रपट अनेकदा स्वीकारार्ह डेसिबलची मर्यादा ओलांडतात, ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा निर्भेळ अनुभव घेता येत नाही.”

हॉरर चित्रपटांमधील (भयपट) ध्वनी निर्मिती कलेवरही चर्चा झाली. कामटे म्हणाले, “एक सशक्त कथानक, ध्वनी शिवायही चित्रपट यशस्वी ठरवू शकतो,” त्यावर बोलताना होहेन म्हणाले, “ध्वनीचे विरळ तुकडे प्रेक्षकांना कथेत खोलवर बुडू देतात.” चित्रपटाचा भावनिक स्वर घडवण्यात संगीत आणि ध्वनीची भूमिका महत्वाची आहे, यावर दोन्ही तज्ञ सहमत झाले.

त्यानंतर संभाषणात पुढे ध्वनि आणि दृश्य यांच्या समन्वयाच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली, त्यामध्ये कामटे यांनी भारतीय सिनेमामध्ये या तंत्रज्ञानाचा झालेल्या विकासाचा मागोवा घेत, लगान हा चित्रपट त्याचा पाया घालणारे उदाहरण असल्याचा दाखला दिला. त्यांनी स्पष्ट केले की, "ध्वनी समन्वयासाठी अत्यंत शिस्त गरजेची असते आणि आवाजाचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी योग्य स्थान निवडण्याची आवश्यकता असते मात्र, अस्सल आवाज टिपण्याचा विचार केल्यास त्याचे परिणाम अप्रतिम दिसतात.”

या सत्रात, हॉलीवुड आणि भारतीय सिनेमा यांच्यातल्या साऊंड डिझाईन पद्धतीतल्या फरकांचा वेध घेतला गेला. कामटे यांनी भारतातल्या आर्थिक मर्यादांमध्ये अनेकदा साऊंड डिझायनर्सना (ध्वनी आरेखक/ध्वनीलेखक) अधिक संसाधनांची कशी गरज भासते यावर प्रकाश टाकला. मास्टर आणि कमांडर सारख्या चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या विस्तृत प्रक्रियेपेक्षा ते वेगळे असते. हौ यांनी नमूद केलं की अशा मर्यादित साधनांमध्ये काम केल्याने नवनिर्मिती केली जाते, अशी टिप्पणी करून, “काही वेळा, आयफोनवर रेकॉर्ड झालेला आवाज अपेक्षेपेक्षा नाट्यमय प्रभाव साधू शकतो.”

चित्रपटनिर्मितीत, ध्वनी आरेखन/ध्वनीलेखनाच्या सहयोगी स्वरूपावर भर दिला. कामटे यांनी, “ध्वनी आरेखक/ ध्वनी लेखकाला ज्या दिग्दर्शकाकडून तपशीलवार माहिती अथवा संदर्भ मिळतो, तेव्हा ते कथेसंदर्भात अधिक जवळून काम कऱण्यास सक्षम होतात.” तर हौ यांनी, “कथेशी ध्वनी उत्तमप्रकारे जुळतोय याची खात्री करून जी दृश्ये अयशस्वी होऊ शकत नाही त्यांच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले जाते.”

सत्राच्या समारोपाला, तज्ज्ञांनी, परदेशी चित्रपटातील ध्वनी आरेखन/ध्वनी लेखनाच्या भूमिकेवर विचार व्यक्त केले. हौ म्हणाले, “उपशीर्षकांच्या बाबतीतही, भावनिक बंध टिकवून ठेवण्यासाठी ध्वनी फार महत्त्वाचा ठरतो.” तर कामटे यांनी, चित्रपट निर्मितीच्या घटकांमध्ये ध्वनी आरेखन/ध्वनी लेखन दुय्यम मानले जाऊ नये असे ठाम मत व्यक्त केले.

नवोदित ध्वनी आरेखक/ ध्वनी लेखकांसाठी दिलेल्या मौल्यवान सल्ल्यासह सत्राचा समारोप झाला. कामटे यांनी "चित्रपटांतील प्रकर्षाने जाणवणाऱ्या ध्वनींचे निरीक्षण आणि द्स्तऐवजीकरण करण्यापासून सुरूवात करा” अशी शिफारस केली. तर हौ यांनी कलाकृतीमधील बारकावे समजून घेण्यासाठी उल्लेखनीय ध्वनी आरेखनाच्या प्रतिध्वनींचा सराव करण्यास प्रोत्साहन दिले. दोन्ही तज्ज्ञांनी वैयक्तिक कौशल्यात सुधारणा कऱण्यासाठी वैयक्तिक ध्वनी लायब्ररी तयार करण्याच्या महत्त्वाला दुजोरा दिला.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | Chippalkatti/Patil/Rajshree/Vijayalaxmi/D.Rane | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076395) Visitor Counter : 10


Read this release in: English , Konkani , Khasi