ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत तांदूळ विक्रीची केली घोषणा - 27 नोव्हेंबर 2024 रोजी लिलाव
Posted On:
22 NOV 2024 6:35PM by PIB Mumbai
मुंबई, 22 नोव्हेंबर 2024
भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI),प्रादेशिक महाराष्ट्र कार्यालयाने खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत [ओएमएसएस (डी)] तांदूळ विक्रीची घोषणा केली आहे.या योजनेअंतर्गत ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून, खरेदीदार भारतीय अन्न महामंडळाच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, “m-Junction Services Limited” या पॅनेलमध्ये स्वतः ला समाविष्ट करून ई- लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात.
तांदूळ साठा खरेदी करण्यात स्वारस्य असलेले व्यापारी, घाऊक खरेदीदार आणि तांदूळ उत्पादक पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करू शकतात: https://www.valuejunction.in/fci/ या पॅनेल प्रक्रियेला 72 तासांचा कालावधी लागतो.
27 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी,एफसीआय गोवा राज्यातून 500 मेट्रिक टन (मेट्रिक टन) तांदूळ देऊ करेल.बोलीसाठी किमान प्रमाण 1 मेट्रिक टन आहे आणि प्रति बोलीदार कमाल प्रमाण 2000 मेट्रिक टन आहे.या खुली बाजार विक्री योजनेमुळे तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2076082)
Visitor Counter : 21