संसदीय कामकाज मंत्रालय
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 24 नोव्हेंबर रोजी सरकार कडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन
Posted On:
20 NOV 2024 4:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024
26 डिसेंबर 2024 रोजी असलेला "संविधान दिन" साजरा करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेची बैठक होणार नाही.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री श्री किरेन रिजिजू हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या सदस्यांची बैठक घेणार आहेत. ही सर्वपक्षीय बैठक, 24 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता, नवी दिल्लीत संसद भवन ॲनेक्स या इमारतीच्या मुख्य समिती कक्षात होईल. संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.
संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यक गरजांनुसार , अधिवेशन 20 डिसेंबर 2024 रोजी संपू शकेल. 26 डिसेंबर 2024 रोजी असलेला संविधान दिन साजरा करण्याच्या निमित्ताने, लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही
S.Patil/A.Save/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2075073)
Visitor Counter : 46