उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताची संस्कृती दिव्यांगजनात देवत्व, उदात्तता आणि अध्यात्म पाहते – उपराष्ट्रपती


दिव्यांगजनांना त्यांची ऊर्जा आणि क्षमता, त्यांच्या आकांक्षा आणि स्वप्ने साकार करण्यासाठी परिसंस्था उपलब्ध- उपराष्ट्रपती

Posted On: 19 NOV 2024 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 नोव्‍हेंबर 2024

 

“5000 वर्षांहून अधिक प्राचीन असलेली आपली संस्कृती जगात  अद्वितीय आहे असे  सांगतानाच, ही संस्कृती  दिव्यांगजनात देवत्व, उदात्तता आणि अध्यात्म पाहते  असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी म्हटले आहे.

आज नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर विशेष ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक बॉची आणि बॉलिंग स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, “या खेळांच्या माध्यमातून संपूर्ण आशिया पॅसिफिकमधील दिव्यांग व्यक्तींसाठी आम्ही एक महत्त्वाची गोष्ट साजरी करत आहोत आणि ती म्हणजे समावेश आणि सन्मान.” विशेष दिव्यांग खेळाडूंना येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकून ते  म्हणाले, “तुम्ही केवळ मैदानावरच नव्हे तर तुम्ही जीवनाच्या खेळातही चॅम्पियन आहात. तुम्ही अश्या आव्हानांवर विजय मिळवता ज्याची आपल्यापैकी अनेकजण केवळ कल्पना करू शकतात.

देशातील खेळांबद्दलच्या दृष्टीकोनात बदल घडून येत असलेल्या बदलांबद्दल बोलताना धनखड यांनी अधोरेखित केले की, “आपल्या सर्वांना भारतातील खेळांबद्दलच्या दृष्टिकोनात मोठा बदल दिसून येत आहे. “खेळाला आता केवळ अभ्यासेतर क्रियाकलाप म्हणून पाहिले जात नाही. हा शिक्षण आणि जीवनाचा एक अत्यावश्यक भाग आहे, चारित्र्य घडवण्याचे साधन  आहे, खेळाने एकात्मता वाढते ”, असे ते पुढे म्हणाले.  

धनखड म्हणाले की, “विशेष दिव्यांग व्यक्तींची राष्ट्र उभारणीत भूमिका असते. लोकशाही प्रक्रियेत दिव्यांगजनांचा सहभाग सुनिश्चित करून आणि साजरा करून प्रशासन अधिक सर्वसमावेशक होत असल्याचे आपल्याला बघायला मिळते आहे. दिव्यांगजनांना त्यांची उर्जा आणि क्षमता जगता यावी, तसेच त्यांच्या आकांक्षा आणि स्वप्ने साकार करता यावीत यासाठी विविध सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.

 

* * *

N.Chitale/H.Kulkarni/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2074817) Visitor Counter : 22