माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ब्रेकिंग बॅरिअर: 55 वा इफ्फी चित्रपट पाहण्याच्या सुलभतेची नवीन मानके सुनिश्चित करत आहे
सबका मनोरंजन: चित्रपट महोत्सवांमध्ये समावेशकता पुन्हा परिभाषित करणे हे 55 व्या इफ्फीचे उद्दिष्ट
#IFFIWood, 19 नोव्हेंबर 2024
55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) अभिमानाने "सबका मनोरंजन" (सर्वांसाठी मनोरंजन) या संकल्पनेचा अवलंब करत प्रेक्षकांना सर्वसमावेशक सिनेमॅटिक अनुभव प्रदान करणार आहे. प्रेक्षकांना सुलभतेने चित्रपट पाहता येणाऱ्या चित्रपट महोत्सवाची परंपरा सुरू राहील हे सुनिश्चित करुन इफ्फिने महोत्सवात विविध क्षमतांच्या सिनेप्रेमींचे वर्षानुवर्षे स्वागत केले आहे. समावेशन भागीदार, राज्य अपंग व्यक्ती आयोग, गोवा, आणि सुलभता भागीदार 'स्वयंम'यांसारख्या प्रमुख सहकार्यांच्या पाठिंब्याने, इफ्फिने चित्रपटाच्या समावेशकतेसाठी एक नवे परिमाण स्थापित केले आहे.
इफ्फी 55 मधील प्रमुख सुलभता उपक्रम खालीलप्रमाणे असतील:
- समावेशी उद्घाटन आणि समारोप समारंभ: इफ्फी च्या इतिहासात प्रथमच, उद्घाटन आणि समारोप समारंभांमध्ये थेट सांकेतिक भाषेतील समालोचन करण्यात येईल. यामुळे श्रवणदोष असलेल्यांसह सर्व उपस्थितांना उत्सवात दृकश्राव्य आनंद मिळवत पूर्णपणे सहभागी होता येईल याची खात्री असेल.
- ऍक्सेसिबल भारतीय चित्रपट विभाग: इफ्फी 2024 चे एक प्रमुख आकर्षण म्हणजे, हा विभाग श्राव्य वर्णन आणि भारतीय सांकेतिक भाषेसह सुधारित निवडक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित करेल. यामुळे दृष्टिहीन आणि श्रवण-दोष असलेल्या प्रेक्षकांनाही कथनांमध्ये रंगून चित्रपटाचा रसास्वाद घेता येईल. 55 व्या इफ्फी मध्ये ऍपद्वारे समर्थित श्राव्य वर्णनासह भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट देखील प्रदर्शित केले जातील. यामुळे चित्रपटाचा सर्वसमावेशक अनुभव घेता येईल. हा विभाग 22 नोव्हेंबर रोजी '12वी फेल'या चित्रपटाच्या प्रदर्शनाने सुरू होईल. हा चित्रपट श्राव्य वर्णन आणि सांकेतिक भाषेतील समालोचनासह प्रदर्शित केला जाईल. ऍक्सेसिबल चित्रपट विभागातील नवा अध्याय प्रसिद्ध नृत्यांगना मेथिल देविका यांच्या भारतीय सांकेतिक भाषेतील शास्त्रीय नृत्य सादरीकरणासह सुरू होईल, हा कार्यक्रम उत्सवाच्या समावेशकतेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
- डिजिटल आणि ऑन-साइट ऍक्सेसिबिलीटी :
- ऑनलाइन व्यासपीठ जसे की उत्सवाचे संकेतस्थळ, ॲप आणि समाज माध्यम या संदर्भात वापरकर्त्याची सुलभता वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
- व्हीलचेअरद्वारे पोहोचण्यायोग्य कार्यक्रम स्थळे, स्वच्छतागृहे आणि पार्किंग सुविधांनी सुसज्ज आहेत. उत्सवादरम्यान कार्यक्रम स्थळी सांकेतिक भाषेचे दुभाषी देखील उपलब्ध असतील.
- मास्टरक्लास आणि पत्रकार परिषद
इफ्फी 2024 दरम्यान "चित्रपटगृहात वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचे प्रदर्शन: सुलभतेचा प्रश्न" या शीर्षकाचा एक विशेष मास्टरक्लास आयोजित केला जाईल. शिवाय, मुख्य अद्यतने आणि चर्चा सर्वांसाठी सुलभ असल्याची खात्री करून, मास्टरक्लास आणि पत्रकार परिषदांमध्ये थेट सांकेतिक भाषेतील समालोचन समाविष्ट असेल.
- सुलभ सुविधेसह दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
- ट्वेल्थ फेल – 22 नोव्हेंबर, सकाळी 11:30 वाजता ( श्राव्य वर्णन, सांकेतिक भाषा)
- बार्तालीज् सायकल – 24 नोव्हेंबर, संध्याकाळी 5:00 वाजता (श्राव्य वर्णन, सांकेतिक भाषेत समालोचन)
- बियॉंड द कोर्ट: भारतीय व्हीलचेअर बास्केटबॉलचा प्रवास – 24 नोव्हेंबर, संध्याकाळी 5:00 वाजता (श्राव्य वर्णन, सांकेतिक भाषा)
- स्ट्राइड – 26 नोव्हेंबर, सकाळी 11:45 वाजता (श्राव्य वर्णन, सांकेतिक भाषा)
- इंडिया वोटस् #WorldsLargestElection – 26 नोव्हेंबर, सकाळी 11:45 वाजता (संकेतिक भाषा)
- व्हेन अपॉर्च्युनिटी नॉक्स रिक्रुटर्स डोअर - 26 नोव्हेंबर, सकाळी 11:45 वाजता (श्राव्य वर्णन, सांकेतिक भाषा)
- ऍप वैशिष्ट्यांद्वारे श्राव्य वर्णनासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन-
आता दृष्टिहीन व्यक्ती Qube Cinemas ने विकसित केलेल्या Moviebuff Access ॲपच्या माध्यमातून चित्रपटांचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात. वर्णनात्मक श्राव्य समालोचन थेट आपल्या फोनवर प्रवाहित करण्यासाठी सहभागींना फक्त कार्यक्रम स्थळावरच्या वाय-फाय शी कनेक्ट होणे गरजेचे आहे.
- स्वातंत्र्य वीर सावरकर (उद्घाटन कार्यक्रमातील चित्रपट) - 21 नोव्हेंबर, सकाळी 11:00 वाजता
- पियानो लेसन (अमेरिका) – 21 नोव्हेंबर, दुपारी 12:45 वाजता
- घरत गणपती – 22 नोव्हेंबर, दुपारी 12:45 वाजता
- महावतार नरसिंह (वर्ल्ड प्रीमियर) – 24 नोव्हेंबर, दुपारी 4:30 वाजता
- सॅम बहादूर - दिग्दर्शन- मेघना गुलझर , 24 नोव्हेंबर, रात्री 8:00 वाजता
- द रुस्टर (ऑस्ट्रेलिया) – 24 नोव्हेंबर, संध्याकाळी 5:15 वाजता
- कलम 370 - 26 नोव्हेंबर , रात्री 8:00 वाजता
- ॲडिशन (ऑस्ट्रेलिया) – 27 नोव्हेंबर, रात्री 10:15 वाजता
55 व्या IFFI चे प्रवेशयोग्यता उपक्रम आघाडीच्या कंटेंट भागीदारांच्या सहकार्याने शक्य झाले आहेत
- आलोक केजरीवाल यांनी स्थापन केलेली संस्था 'इंडिया साइनिंग हँड्स' ही दिव्यांग सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तकर्ता आहे
- 'येस, वुई टू कॅन' चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना राष्ट्रीय पॅरालिम्पिक जलतरण चॅम्पियन सुश्री माधवी लता प्रथिगुडुपू यांनी केली.
- क्यूब सिनेमाने विकसित केलेले 'मुव्ही बफ ॲप' पडद्यावरील चित्रपटाचे अखंड ऑडिओ वर्णन सुलभ करते.
- Dubswork Mobile Pvt Ltd ने विकसित केलेले
- 'Cinedubs App' बहुभाषिक स्क्रीनिंगला बळकटी देते तसेच विविधता आणि समावेशन अधोरेखित करते.
- 'बिलियन रीडर्स' ही एक ना-नफा- ना-तोटा संस्था आहे जी विविधतेला आणि सिनेमातील समावेशनाला प्रोत्साहन देते, व्यापक प्रतिनिधित्व आणि प्रवेशयोग्यतेला याला देखील प्रोत्साहन देते.
सहानुभूती/ आपुलकी आणि सर्वसमावेशकतेसाठी वचनबद्ध चमू
प्रत्येक पाहुण्याला आपले यथा योग्य स्वागत झाले आहे, आपल्याला समजून घेतले जात आहे आणि आपल्याला योग्य सन्मान मिळाला आहे असे वाटेल याची खात्री करण्यासाठी IFFI चमूने सर्वसमावेशक संवेदनशीलता प्रशिक्षण घेतले आहे. ही तयारी IFFI कर्मचाऱ्यांना संवेदनशील आणि वैयक्तिक आधार देण्यासाठी सुसज्ज करते आणि संपूर्ण फेस्टिवलच्या काळात सर्वसमावेशक आणि पाहुण्यांबाबतीत आदरयुक्त वातावरण निर्माण करण्यास मदत करते.
सर्वसमावेशकतेसाठी IFFI ची वचनबद्धता या महोत्सवाची “सबका मनोरंजन” ही व्यापक दृष्टी प्रतिबिंबित करते. प्रत्येकजण सिनेमाची जादू अनुभवू शकेल अशा वातावरणाला प्रोत्साहन देऊन सामायिक सांस्कृतिक अनुभव निर्माण करण्यात ग्लोबल लीडर म्हणून 55 व्या IFFI ने आपल्या भूमिकेची पुष्टी केली.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Shraddha/Hemangi/D.Rane | IFFI 55
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2074816)
Visitor Counter : 21