दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार कायदा, 2023 अंतर्गत प्रसारण सेवांच्या तरतुदीसाठी सेवा प्राधिकरणाच्या चौकटीविषयी ट्रायच्या सल्लामसलत पत्रावर टिप्पणी /प्रति- टिप्पणी प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ
Posted On:
19 NOV 2024 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2024
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने 30 ऑक्टोबर 2024 रोजी 'दूरसंचार कायदा, 2023 अंतर्गत प्रसारण सेवांच्या तरतुदीसाठी सेवा प्राधिकरणांच्या चौकटीविषयी' सल्लामसलत पत्र प्रसिद्ध केले आहे. सल्लामसलतीमध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांवर संबंधितांकडून लेखी टिप्पण्या प्राप्त करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2024 आणि प्रति-टिप्पण्यांसाठी 27 नोव्हेंबर 2024 निश्चित केली होती
मात्र, काही हितधारकांच्या विनंत्या लक्षात घेऊन, लेखी टिप्पण्या आणि प्रति-टिप्पणी सादर करण्याच्या शेवटच्या तारखा अनुक्रमे 27 नोव्हेंबर 2024 आणि 4 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील कोणत्याही मुदतवाढीची विनंती विचारात घेतली जाणार नाही.
टिप्पण्या/प्रति-टिप्पण्या, शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात advbcs-2@trai.gov.inandjtadvisor-bcs@trai.gov.in वर पाठवल्या जाऊ शकतात. कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीसाठी, दीपक शर्मा, सल्लागार (B&CS), TRAI यांच्याशी दूरध्वनी क्रमांक +91-11-20907774 वर संपर्क साधला जाऊ शकतो.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2074809)
Visitor Counter : 7