राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय
azadi ka amrit mahotsav

भारत एनसीएक्स 2024 चे झाले औपचारिक उद्घाटन: भारतातील सायबर संरक्षण व धोरणात्मक निर्णयक्षमता मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

Posted On: 18 NOV 2024 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2024

 

आज राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (एनएससीएस) आणि राष्ट्रीय रक्षाशक्ती विद्यापीठ (आरआरयू) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उच्चस्तरीय समारंभात भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव (भारत एनसीएक्स 2024) या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारताची सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठीचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

12 दिवस चालणारा हा उपक्रम सायबर सुरक्षा व्यावसायिक व आघाडीच्या संस्थांना प्रगत सायबर संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन कौशल्ये, आणि धोरणात्मक निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी सज्ज करतो.

उद्घाटन समारंभात निवृत्त लेफ्टनंट जनरल राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम एम. यू. नायर यांनी सांगितले, “भारत एनसीएक्स 2024 आपल्या देशातील सायबर संरक्षण तज्ञ आणि नेत्यांना गुंतागुंतीचे धोके कमी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करते. तांत्रिक सरावापासून धोरणात्मक निर्णयक्षमते पर्यंत, हा उपक्रम सर्व स्तरांवरील आपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी आपली सज्जता सुनिश्चित करतो.”

राष्ट्रीय रक्षाशक्ती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) बिमल एन. पटेल यांनी मुख्य भाषणात सायबर सुरक्षा समस्यांवर शिक्षण, संशोधन, आणि नवकल्पना यांचे एकत्रीकरण कसे महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले, “हा सराव केवळ तांत्रिक कौशल्येच मजबूत करत नाही तर राष्ट्रीय पातळीवरील सायबर आपत्तींशी लढण्यासाठी उच्च नेतृत्व देखील तयार करतो.” 

भारत एनसीएक्स 2024 चे महत्त्वाचे घटक:

  • सायबर संरक्षण आणि घटना प्रतिसादाचे सखोल प्रशिक्षण: आयटी व ओटी प्रणालींवर सायबर हल्ल्याच्या प्रत्यक्ष धोक्यांपासून बचावासाठी सक्षम होणे. 
  • सहकारी व्यासपीठे: सरकारी व औद्योगिक भागधारकांसाठी सहकार्य आणि विचारमंथनाची संधी. 
  • धोरणात्मक निर्णयक्षमता सराव: वरिष्ठ व्यवस्थापनाला राष्ट्रीय पातळीवरील सायबर संकटांमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याचा अनुभव मिळवून देणे. 
  • सीआयएसओ संमेलन: सरकारी, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सीआयएसओ) नवीनतम प्रवाह व सरकारी उपक्रमांवर चर्चा करतील.
  • भारतीय सायबर सुरक्षा स्टार्टअप प्रदर्शन: भारतीय स्टार्टअप्सद्वारे सायबर सुरक्षेतील अभिनव उपायांची सादरीकरणे केली जातील. 

हे कार्यक्रम 18 ते 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालणार असून, समारोप समारंभात शिकलेल्या धड्यांचे एकत्रीकरण आणि सायबर सुरक्षेतील सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा केली जाईल.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2074421) Visitor Counter : 15