युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ.मनसुख मांडवीय यांनी स्वच्छ खेळांचे केले समर्थन; एनएडीए इंडियाच्या ‘नो युअर मेडिसिन’ ॲपचे केले उद्‌घाटन आणि वापराचा आग्रह

Posted On: 14 NOV 2024 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2024

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी क्रीडाविश्वातील अंमली पदार्थ सेवनाविरोधात देशव्यापी लढा तीव्र करण्याचे आवाहन करत भारतीय एनएडीए अर्थात ‘नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी’च्या ‘नो युअर मेडिसिन’ (केवायएम) ॲपचे उद्घाटन केले आणि क्रीडापटू, प्रशिक्षक आणि एकूणच क्रीडा समुदायाने याचा वापर करावा, अशी आग्रही विनंती केली.या नव्या ॲपमुळे क्रीडापटूंना आवश्यक माहिती उपलब्ध होऊन औषधांमार्फत अनवधानाने होणारे अंमली पदार्थांचे सेवन टाळून खेळांत निष्पक्षता राखणे शक्य होईल.

आपल्या संदेशात डॉ.मांडवीय यांनी खेळातील प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, आपले क्रीडापटू हा राष्ट्राचा अभिमान आहे आणि त्यांच्या स्वच्छ व निःष्पक्ष  स्पर्धेला पाठबळ देण्यासाठी आवश्यक साहित्य त्यांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. सर्व क्रीडापटू, प्रशिक्षक आणि क्रीडा व्यावसायिकांनी केवायएम ॲप डाऊनलोड करून अनवधानाने होणारे अंमली पदार्थांचे सेवन टाळून खेळाच्या न्याय्य आणि पारदर्शी संस्कृतीत योगदान द्यावे, म्हणून मी प्रोत्साहन देतो.

भारतीय एनएडीएच्या अंमली पदार्थ सेवनविरोधी जागरूकता, शिक्षण आणि क्रीडापटूंना खेळ स्वच्छ राखण्यासाठी आवश्यक माहितीचा पुरवठा करण्यासाठी असलेल्या अभियानाचा केवायएम ॲप एक भाग आहे. ॲपच्या वापरकर्त्याला ठराविक औषध किंवा त्यातील घटक पदार्थ ‘वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी’ (डब्ल्यूएडीए) च्या प्रतिबंधात्मक यादीत समाविष्ट आहेत का हे पाहता येते.अशा प्रकारे केवायएम ॲपमार्फत झटपट पडताळणी करून क्रीडापटूंना आपल्या औषधांबाबत जागरूक राहणे आणि खेळात नैतिकता, प्रामाणिकपणा आणि खिलाडू वृत्ती जपण्यास मदत मिळते.

ॲपवरील फोटो आणि ऑडिओ सर्चची खास सुविधा वापरकर्त्याला त्याचा क्रीडा प्रकार निवडून ठराविक क्रीडा प्रकाराशी संबंधित आवश्यक माहिती मिळवणे सहज शक्य होते. 

केवायएम ॲपची लिंक –

https://play.google.com/store/apps/details?id=com.nada.doppingapp&hl=en&gl=US

एनएडीए इंडियाचे संकेतस्थळ - https://nadaindia.yas.gov.in/

केवायएमसाठी क्यूआर कोड –

S.Kane/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

(Release ID: 2073500) Visitor Counter : 16