माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 5

इफ्फी 2024 मध्ये प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी नोंदणी प्रक्रिया 24 तासांसाठी पुन्हा खुली झाली


सिनेमाचा आनंद सर्वांमध्ये सामाईक करण्यासाठी जास्तीत जास्त माध्यम प्रतिनिधींना सामावून घेण्याचा इफ्फीचा प्रयत्न

# IFFIWood,14 नोव्हेंबर 2024

प्रसारमाध्यम समुदायाकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेली मागणी विचारात घेऊन आणि या महोत्सवाचे वार्तांकन करण्यासाठी जास्तीत जास्त माध्यम प्रतिनिधींना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, प्रसारंमाध्यम प्रतिनिधींसाठी नोंदणी प्रक्रिया पुन्हा एकदा 24 तासांसाठी सुरू केली जाणार आहे. आज संध्याकाळी(14 नोव्हेंबर 2024) पाच वाजल्यापासून(04:59:59) ही प्रक्रिया सुरू केली जाईल. ज्या माध्यम प्रतिनिधींनी अद्यापही नोंदणी केलेली नाही त्यांना तातडीने नोंदणी करण्याचे आणि ही शेवटची संधी न दवडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नोंदणी प्रक्रिया

प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी  1 जानेवारी 2024 रोजी तुमचे वय 21 वर्षे पूर्ण असले पाहिजे आणि तुम्ही एखाद्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल किंवा ऑनलाईन माध्यम संघटना यांचे एक प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरा पर्सन किंवा डिजिटल आशय निर्माते असणे आवश्यक आहे. वयाची अट पूर्ण करणाऱ्या मुक्त पत्रकारांना देखील  नोंदणी करता येऊ शकेल. नोंदणी करण्यापूर्वी कृपया संबंधित पात्रता निकषांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि नोंदणीपूर्वी नमूद केलेली कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तयार ठेवा.  नोंदणी प्रक्रिया अतिशय साधी आणि सहज आहे आणि ती  https://my.iffigoa.org/media-login येथे पूर्ण करता येईल.

तुमच्या अर्जाची छाननी केल्यानंतर, प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून तुमच्या अधिस्वीकृतीला मिळालेली मान्यता, तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर कळवण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. या नोंदणी प्रक्रियेतून पत्र सूचना कार्यालयाने(पीआयबी) अधिस्वीकृत केलेले प्रसारमाध्यम प्रतिनिधीच 55व्या  इफ्फी 2024 च्या प्रसारमाध्यम प्रतिनिधी पासेस करिता पात्र असतील. माध्यमांच्या प्रसारणांचा कालावधी आणि संख्या, आकारमान( वितरण, प्रेक्षकवर्ग, व्याप्तीनुसार), चित्रपटांवरील भर आणि इफ्फीचे अपेक्षित माध्यम वार्तांकन यांच्या आधारावर, देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृतींची संख्या पीआयबी निश्चित करेल.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी असलेली प्रवेशपत्रे इफ्फीच्या कार्यक्रम स्थळी 18 नोव्हेंबर 2024 पासून मान्यताप्राप्त प्रसारमाध्यम प्रतिनिधींना उपलब्ध होतील. या संदर्भातील शंकांच्या निरसनासाठी iffi4pib[at]gmail[dot]com वर प्रसारमाध्यम मान्यताप्राप्ततेबाबत प्रश्न अशा आशयाच्या विषयासह ईमेल पाठवावा,ही विनंती.

इथे नोंदणी करा आणि आम्ही आपले पुन्हा एकदा चित्रपटजगतातील आनंद सामायिक करण्यासाठी स्वागत करतो!

चित्रपट प्रदर्शनांच्या वेळी आपली भेट होईलच!

इफ्फी विषयी -

भारतीय आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सव – इफ्फीला 1952 मध्ये सुरुवात झाली. आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी इफ्फी एक आहे. चित्रपट, त्यांच्या चित्तवेधक कथा आणि ते साकारणाऱ्या व्यक्तींचे यश साजरीकरणाचे उद्दीष्ट सुरुवातीपासूनच इफ्फीने समोर ठेवले. चित्रपटांप्रती प्रेम आणि त्यांचे रसग्रहण, जनमनातील सौहार्द यांचा प्रसार आणि व्यक्ती आणि समष्टीला नवी उंची गाठण्यास प्रेरित करण्याचा इफ्फीचा हेतू आहे.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आणि गोवा सरकारच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्या सहयोगाने दरवर्षी इफ्फीचे आयोजन केले जाते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील चित्रपट महोत्सव संचलनालय इफ्फीच्या आयोजनाचे नेतृत्व करत असे, ते पुढे एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर एनएफडीसीकडे इफ्फीचे आयोजन आले. 55व्या इफ्फीविषयी अद्ययावत माहितीसाठी महोत्सवाच्या   www.iffigoa.org या संकेतस्थळाला भेट द्या आणि X, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांसह व्हॉट्सॲपवर पीआयबीला फॉलो करा.

 

PIB Mumbai | S.Kane/S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 
iffi reel

(Release ID: 2073385) Visitor Counter : 34