वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पेटंट, ट्रेडमार्क आणि औद्योगिक डिझाइन्स यामध्ये भारत पहिल्या 10 देशांमध्ये : ‘डब्ल्यूआयपीओ 2024’ चा अहवाल
Posted On:
12 NOV 2024 7:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2024
जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (डब्ल्यूआयपीओ) ने 2024 च्या जागतिक बौद्धिक संपदा निर्देशकांची (डब्ल्यूआयपीआय) यादी प्रकाशित केली असून बौद्धिक संपदा (आयपी) हक्कांसाठी अर्ज दाखल करण्याकडे जगभरात कल वाढत असल्याचे त्याद्वारे अधोरेखित केले आहे.प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये पेटंट म्हणजे बौध्दिक स्वामित्व , व्यवसाय चिन्ह (ट्रेडमार्क) आणि औद्योगिक डिझाइनसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे या अहवालाने दाखवून दिले आहे. पेटंट, व्यवसाय चिन्ह (ट्रेडमार्क) आणि औद्योगिक डिझाइन हे तीनही प्रमुख बौद्धिक संपदा (आयपी) हक्क प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताने जगातील पहिल्या 10 देशांमध्ये स्थान मिळवले आहे.
वर्ष 2018 ते 2023 या कालावधीत, पेटंट आणि औद्योगिक डिझाइनसाठी अर्ज दाखल होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे, तर व्यापारचिन्ह नोंदणीसाठीच्या अर्जांमध्ये 60% वाढ झाली आहे, यामधून आयपी आणि नवोन्मेषावरील देशाचा वाढता भर दिसून येतो. भारताच्या पेटंट-आणि -सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) यांच्या गुणोत्तरातही लक्षणीय वाढ दिसून आली असून ते गेल्या दशकातील 144 वरून वाढून 381 वर पोहोचले आहे,ही बाब आर्थिक विस्ताराबरोबरच आयपी क्रियाकलापांमध्येही वाढ होत असल्याचे दर्शवणारी आहे.
व्यापार चिन्हासाठी दाखल झालेल्या अर्जांच्या प्रमाणात 2023 मध्ये 6.1% वाढ झाल्याने जागतिक स्तरावर भारताने चौथा क्रमांक पटकावला आहे. यापैकी जवळपास 90% अर्ज हे देशातील रहिवाशांचे असून त्यामध्ये आरोग्य (21.9%), कृषी (15.3%) आणि कपडे (12.8%) यासह अन्य प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.
संपूर्ण अहवाल पुढील लिंकवर पाहता येईल:
https://www.wipo.int/edocs/pubdocs/en/wipo-pub-941-2024-en-world-intellectual-property-indicators-2024.pdf
S.Bedekar/M.Ganoo/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2072847)
Visitor Counter : 58