संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘गरुड शक्ती’ या संयुक्त सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या विशेष दलांची तुकडी इंडोनेशियाला रवाना.

Posted On: 01 NOV 2024 10:47AM by PIB Mumbai

 

भारत-इंडोनेशिया लष्कराच्या विशेष दलांचा संयुक्त सराव ‘गरुड शक्ती-24 च्या 9 व्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी 25 जवानांचा समावेश असलेली भारतीय लष्कराची तुकडी इंडोनेशियामधील जकार्ता येथील सिझांटुंगकडे येथे रवाना झाली आहे. 1 ते 12 नोव्हेंबर 2024 या कालावधीत हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट (स्पेशल फोर्सेस) तुकडी करत आहे तर इंडोनेशियन स्पेशल फोर्सेस कोअरच्या 40 जवानांचा समावेश असलेल्या तुकडी द्वारे इंडोनेशियन तुकडीचे प्रतिनिधित्व केले जात आहे.

दोन्ही देशांना एकमेकांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणे, दोन्ही सैन्याच्या विशेष दलांमधील परस्पर सामंजस्य, सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हे गरुड शक्ती 24 या सरावाचे उद्दिष्ट आहे.   या सरावाची रचना द्विपक्षीय लष्करी सहकार्य विकसित करण्यासाठी तसेच चर्चेद्वारे आणि सामरिक लष्करी कवायतींच्या तालीमद्वारे दोन सैन्यांमधील संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.

या सरावामध्ये विशेष मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी, सैन्याच्या विशेष दलांची कौशल्ये विकसित करण्यासाठी अभिमुखता, शस्त्रे, उपकरणे, नवोन्मेष, डावपेच, तंत्र आणि कार्यपद्धती यावरील माहितीचे आदान-प्रदान यांचा समावेश असेल.  संयुक्त सराव गरुड शक्ती 24 मध्ये जंगलाच्या प्रदेशात विशेष सैन्य दलाच्या मोहिमांचा संयुक्त सराव करणे, दहशतवादी तळांवर हल्ले करणे आणि लष्करी सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांच्या जीवनशैली आणि संस्कृतीची अंतर्दृष्टी प्राप्त करण्याव्यतिरिक्त मूलभूत आणि आधुनिक विशेष सैन्य कौशल्ये समाविष्ट करणारा प्रमाणीकरण सराव यांचाही समावेश असेल.

या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्य दलांना त्यांचे परस्पर संबंध मजबूत करण्याची आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याची संधी मिळेल. सामायिक सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि दोन मैत्रीपूर्ण राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून देखील हा सराव काम करेल.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2070085) Visitor Counter : 86