दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ट्राय ने 'दूरसंचार कायदा, 2023 अंतर्गत प्रक्षेपण सेवांच्या तरतुदीसाठी सेवा प्राधिकरणाच्या आराखड्याकरिता सल्लापत्र केले जारी
Posted On:
30 OCT 2024 3:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2024
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आज 'दूरसंचार कायदा, 2023 अंतर्गत प्रक्षेपण सेवांच्या तरतुदीसाठी सेवा प्राधिकरणाचा आराखडा' या विषयावर एक सल्लापत्र जारी केले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 25 जुलै 2024 रोजी एका पत्राद्वारे, ट्राय’ला एक संदर्भ पाठवून दूरसंचार कायदा, 2023 भारताच्या अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्याची माहिती दिली आहे. दूरसंचार कायदा, 2023 चे कलम 3(1)(a) अद्याप अधिसूचित केले गेलेले नाही. यामध्ये अटी आणि शर्तींच्या अधीन, शुल्क किंवा अधिभारासह, विहित केल्याप्रमाणे दूरसंचार सेवा प्रदान करू इच्छिणाऱ्या कोणत्याही घटकाकडून अथवा व्यक्तीद्वारे अधिकृतता प्राप्त करण्याची तरतूद आहे.
प्रसारण सेवांच्या संदर्भात, संदर्भाने सूचित केले आहे की अनेक प्रसारण व्यासपीठे (जी रेडिओ लहरी आणि सेवा प्रदान करण्यासाठी स्पेक्ट्रम वापरतात) उदा. डीटीएच, एचआयटीएस, आयपीटीव्ही, दूरदर्शन चॅनेलचे अपलिंकिंग अथवा डाउनलिंकिंग (टेलिपोर्टसह), एसएनजी, डीएसएनजी, कम्युनिटी रेडिओ, एफएम रेडिओ इत्यादींना भारतीय टेलिग्राफ कायदा, 1885 च्या कलम 4 अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे परवाना किंवा परवानगी किंवा नोंदणी जारी केली जाते, त्याची जागा आता दूरसंचार कायदा, 2023 घेईल.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2069519)
Visitor Counter : 37