राष्ट्रपती कार्यालय
भारतीय व्यापार सेवा आणि भारतीय कॉस्ट अकाउंटस सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट
Posted On:
29 OCT 2024 9:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2024
भारतीय व्यापार सेवा आणि भारतीय कॉस्ट अकाउंटस सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (29 ऑक्टोबर 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
दरडोई उत्पन्नाची पातळी वाढवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर अशांत वातावरण असतानाही वाढीचा उच्च स्तर राखण्यासाठी भारताने खाजगी गुंतवणूक आकर्षित गरज आहे, असे राष्ट्रपती या प्रसंगी बोलताना म्हणाल्या.
महसुलाचे पारदर्शक मूल्यमापन सुनिश्चित करताना कॉस्ट अकाउंटस सेवा अधिकारी सरकारी कामकाज, योजना आणि प्रकल्पांमधील खर्चाचे तर्कसंगतीकरण करण्यात सक्रिय भूमिका बजावतात, असे राष्ट्रपती म्हणाल्या. या अधिकाऱ्यांकडे जटिल आर्थिक आणि खर्च व्यवस्थापन समस्या हाताळण्याचे कौशल्य असणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले. विविध द्विपक्षीय आणि बहुपक्षीय करारांतर्गत अँटी-डंपिंग उपाय आणि सुरक्षा कर्तव्ये यासारख्या आंतरराष्ट्रीय व्यापार बाबींवर मार्गदर्शन करण्यात हे अधिकारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असेही त्या म्हणाल्या. या अधिकाऱ्यांचे निर्णय आणि कृती सार्वजनिक वित्ताचे रक्षण करण्यासाठी तसेच सरकारी खरेदी प्रणालीमध्ये कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरेल असे राष्ट्रपती म्हणाल्या.
आपल्या कृतीचा त्याचा अंतिम परिणाम समाजातील वंचित घटकांच्या कल्याणावर होतो या वस्तुस्थितीची जाणीव या अधिकाऱ्यांनी ठेवण्याचा सल्ला राष्ट्रपतींनी दिला.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2069405)
Visitor Counter : 11