श्रम आणि रोजगार मंत्रालय
'ईएसआय' अर्थात 'कर्मचारी राज्य विमा' योजने अंतर्गत 20.74 लाख नव्या कामगारांची ऑगस्ट 2024 मध्ये नोंद
25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 9.89 लाख तरुण कर्मचाऱ्यांचा नव्या नोंदणीत समावेश
4.14 लाख महिला कर्मचाऱ्यांचा ईएसआय योजनेत समावेश
ऑगस्ट 2024 मध्ये 28,917 नवीन आस्थापनांचा ईएसआय योजनेत समावेश
60 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांचा ईएसआय योजनेत ऑगस्ट 2024 मध्ये समावेश
Posted On:
26 OCT 2024 2:56PM by PIB Mumbai
ईएसआयसीच्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारी नुसार, ऑगस्ट 2024 मध्ये 20.74 लाख नवीन कर्मचारी समाविष्ट झाले आहेत.
ऑगस्ट 2024 मध्ये 28,917 नवीन आस्थापनांचा सामाजिक सुरक्षेच्या ईएसआय योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेच्या सामाजिक सुरक्षा छत्राचा लाभ आता अधिक कामगारांना मिळेल.
याव्यतिरिक्त, वर्ष दर वर्षाच्या विश्लेषणानुसार, ऑगस्ट 2023च्या तुलनेत नोंदणीमध्ये 6.80% वाढ झाली आहे.
वर्ष दर वर्ष तुलना
|
शीर्षक
|
ऑगस्ट 2023
|
ऑगस्ट 2024
|
वाढ
|
ऑगस्ट महिन्यात नोंदणीकृत नवीन कर्मचाऱ्यांची संख्या
|
19.42 लाख
|
20.74 लाख
|
1.32 लाख
|
आकडेवारीतून हे दिसून येते की, ऑगस्ट महिन्यातील 20.74 लाख कर्मचाऱ्यांपैकी 9.89 लाख कर्मचारी, म्हणजेच सुमारे 47.68% कर्मचारी हे 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत.
त्याचबरोबर, वेतनपट आकडेवारी विश्लेषणानुसार, ऑगस्ट 2024 मध्ये 4.14 लाख महिला सदस्यांची नोंदणी झाली आहे. याशिवाय, 60 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनीही ऑगस्ट 2024 मध्ये ईएसआय योजनेत नोंदणी केली आहे, ज्यामुळे ईएसआयसीच्या वतीने समाजातील प्रत्येक वर्गासाठी लाभ वितरित करण्याची बांधिलकी स्पष्ट होते.
डेटा निर्मिती ही सतत होत असलेली प्रक्रिया असल्याने ही वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2068512)
Visitor Counter : 37