पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सातव्या भारत-जर्मनी आंतरसरकारी चर्चेमध्ये पंतप्रधानांचे प्रारंभिक संबोधन

Posted On: 25 OCT 2024 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024

महामहिम,

आपण  आणि आपल्या  शिष्टमंडळाचे सातव्या भारत-जर्मनी आंतरसरकारी चर्चेमध्ये हार्दिक स्वागत.

महामहिम,

आपली  ही तिसरी भारतभेट आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळातील आयजीसीची ही पहिली बैठक आहे हे माझे भाग्य आहे.एका प्रकारे आपल्या मैत्रीचा हा तिहेरी आनंदोत्सव आहे.

महामहिम,

2022 मध्ये बर्लिन येथे झालेल्या गेल्या आंतरसरकारी चर्चेदरम्यान आपण द्विपक्षीय सहकार्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले.

गेल्या दोन वर्षात आपल्या धोरणात्मक भागीदारीच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्साहवर्धक प्रगती झाली आहे.संरक्षण, ऊर्जा आणि हरित आणि शाश्वत विकास यांसारख्या क्षेत्रातील वाढते सहकार्य परस्पर विश्वासाचे प्रतीक बनले आहे. 

महामहिम,

जगाची सध्या ताणतणाव, संघर्ष आणि अनिश्चिततेमधून वाटचाल सुरू आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात कायद्याचे राज्य आणि सागरी वाहतूक स्वातंत्र्य याबाबत देखील गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.अशा काळात भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारी एखादा  मजबूत नांगर म्हणून पुढे येऊ लागली  आहे.

हे परस्परांमधील व्यावहारिक संबंध नाहीत.

ती दोन समर्थ  आणि भक्कम लोकशाहींमधील परिवर्तनात्मक भागीदारी आहे, एक अशी भागीदारी जी जागतिक समुदाय आणि मानवतेकरिता एक स्थिर, सुरक्षित आणि शाश्वत भवितव्य निर्माण करण्यामध्ये योगदान देत आहे.  

या संदर्भात तुम्ही गेल्या आठवड्यात जारी केलेले  फोकस ऑन इंडिया हे धोरण स्वागतार्ह आहे.

महामहिम,

आपण, आपल्या भागीदारीचा विस्तार करण्यासाठी आणि ती नव्या उंचीवर नेण्यासाठी अनेक नवे आणि महत्त्वाचे उपक्रम हाती घेत आहोत याचा मला आनंद आहे. एक संपूर्ण सरकार या दृष्टीकोनापासून एक संपूर्ण देश या दृष्टीकोनाकडे आम्ही वाटचाल करत आहोत.

दोन्ही देशांचे उद्योग, नवोन्मेषकरर्ते आणि युवा प्रतिभा यांच्यासोबत जोडले जात आहेत. तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे वचनबद्ध आहोत. कृत्रिम प्रज्ञा, सेमीकंडक्टर्स आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये आमचे सहकार्य आणखी बळकट करणारा  नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचा आराखडा आज प्रसिद्ध केला जात आहे.

आताच आम्ही जर्मन व्यवसायांच्या आशिया-प्रशांत परिषदेत सहभागी झालो आणि लवकरच, आम्ही सीईओ फोरममध्ये देखील सहभागी होऊ. यामुळे आमचे सहकार्य आणखी बळकट होईल. आमच्या अर्थव्यवस्थांमध्ये विविधता आणण्याच्या आणि जोखीम कमी करण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती मिळेल, सुरक्षित, विश्वासार्ह आणि विश्वासार्ह पुरवठा मूल्य साखळी तयार करण्यात मदत होईल.

हवामानविषयक उपाययोजना करण्याच्या आमच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, आम्ही नवीकरणीय ऊर्जेमध्ये जागतिक गुंतवणुकीसाठी एक मंच तयार केला आहे. आज, हरित हायड्रोजन आराखडा देखील जारी करण्यात आला आहे.

भारत आणि जर्मनी दरम्यान शिक्षण, कौशल्य विकास आणि मोबिलिटी  मध्ये प्रगती होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. जर्मनीने जारी केलेल्या स्किल्ड लेबर मोबिलिटी धोरणाचे आम्ही स्वागत करतो. आजची बैठक आमची भागीदारी नव्या उंचीवर नेईल, असा मला विश्वास आहे.आता मला तुमचे विचार ऐकायला आवडतील.

त्यानंतर माझे सहकारी विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याला चालना देण्यासाठी उचललेल्या विविध पावलांबद्दल माहिती देतील.

पुन्हा एकदा मी आपले  आणि आपल्या  शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो.

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2068218) Visitor Counter : 45