भारताचा लोकपाल
लोकपालांनी, कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठीच्या निकषाअंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2024 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024
लोकपालांनी दिनांक 18 ऑक्टोबर 2024 च्या परिपत्रकाद्वारे,लोकपालांसाठी कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठीच्या निकषाअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आता 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे.
लोकपालांनी भारताच्या लोकपाल कार्यालयातील कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठी निकष तयार केले आहेत. हे निकष 25 सप्टेंबर 2024 च्या परिपत्रकाद्वारे लोकपालांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
त्याच बरोबर, दिनांक 25 सप्टेंबर 2024 च्या परिपत्रकानुसार, लोकपाल कार्यालयातील कायदेविषयक वार्ताहर म्हणून मान्यता प्राप्त करण्यासाठी इच्छुक आणि पात्र पत्रकार तसेच वार्ताहरांकडून 30 दिवसांच्या आत अर्ज मागविण्यात आले होते.
2. सर्व संबंधीतानी ही स्थिती लक्षात घ्यावी जेणेकरून ते दिलेल्या मुदतीत अर्ज दाखल करू शकतील.
(परिशिष्ट-I) (लिंक: https://lokpal.gov.in/pdfs/NormsLegalCorrespondents.pdf )
(परिशिष्ट-II) (लिंक: https://lokpal.gov.in/pdfs/applicationsLegalCorrespondents.pdf )
(परिशिष्ट-III) (लिंक: https://lokpal.gov.in/pdfs/legal_correspondent.pdf)
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2068182)
आगंतुक पटल : 72