वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या भौतिक, डिजिटल किंवा सामाजिक पायाभूत सुविधा वाढीच्या क्षमतेला जर्मनीच्या अभियांत्रिकी अचूकतेची जोड जगाला लाभदायक ठरेल -पीयूष गोयल

Posted On: 25 OCT 2024 4:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024

जर्मनीची अभियांत्रिकीतील अचूकतेची कला आणि भारताची भौतिक, डिजिटल किंवा सामाजिक पायाभूत सुविधांच्या वाढीची क्षमता एकत्र आल्यामुळे जगामध्ये असाधारण निर्मिती करण्यास मदत होईल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. 18 व्या जर्मन व्यवसाय आशिया प्रशांत परिषदेचे गोयल यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. भारत आणि जर्मनीच्या सहयोगाबाबत ते म्हणाले की भारत आणि जर्मनी यांच्यातील ऊर्जा एकत्र आल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता-एआयच्या स्वीकारापासून ते सेमिकंडक्टर्सपर्यंत, राष्ट्राच्या चैतन्यपूर्ण स्टार्टअप व्यवस्थेला हातभार लावण्यापासून ते हरित तंत्रज्ञानासाठी सहकार्यापर्यंत अभूतपूर्व वाढ शक्य होईल.

हवामान बदलाचा सामना करण्याबाबत गोयल यांनी 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद-सीओपी 21 मध्ये भारताने व्यक्त केलेल्या वचनबद्धतेवर भर दिला आणि सांगितले की ग्लोबल साऊथ आणि विकसित देशांच्या बरोबरीने या समस्येच्या उपाययोजनेचा भारत भाग राहील.

ही जर्मन व्यवसाय परिषद उदयास येणारे कल ओळखून जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. सर्वोत्तम पद्धतींचा देवाणघेवाण, तंत्रज्ञानाची प्रगती आणि भविष्यातील औद्योगिक वाढीसाठी धोरणांना आकार देणे या परिषदेमुळे शक्य होईल, असे गोयल म्हणाले. भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागिदारी दृढ होईल आणि त्यातून दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था व नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने वाढ होईल, अशी आशा केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली.

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2068133) Visitor Counter : 36