संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी,सहा एअर कुशन वाहनांसाठी, गोव्यातील चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडबरोबर 387.44 कोटी रुपयांचा केला करार
Posted On:
24 OCT 2024 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024
संरक्षण मंत्रालयाने 24 ऑक्टोबर 2024 रोजी गोव्यातील चौगुले आणि कंपनी प्रा.लि.यांच्यासोबत भारतीय तटरक्षक दलासाठी एकूण 387.44 कोटी रुपयांच्या सहा एअर कुशन वाहनांच्या (ACV) खरेदीसाठी एका करारावर स्वाक्षरी केली.पाण्यावर तसेच जमिनीवर सरकणाऱ्या या नौका ज्यांना 'हॉवरक्राफ्ट्स' असे देखील म्हणतात,त्यांची खरेदी (भारतीय ) या श्रेणी अंतर्गत खरेदी केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेनुसार, ही स्वदेशी बनावटीची एअर कुशन वाहने प्रथमच देशात तयार करण्यात आली असून देशाच्या जहाज बांधणी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.या प्रकल्पामुळे तांत्रिक कौशल्य आणि स्वदेशी निर्मितीला सहाय्य मिळणार असून त्यामुळे सूक्ष्म लघु, मध्यम (एमएसएमई) क्षेत्राचा वैशिष्ट्यपूर्ण विकास साध्य होईल.
या खरेदीचे उद्दिष्ट भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमतेला चालना देत सागरी सुरक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित करणे हे आहे. अतिवेगवान किनारा गस्त (हायस्पीड कोस्टल पेट्रोलिंग),पूर्व टेहेळणी, शोध आणि बचावकार्य तसेच संकटात सापडलेल्या जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना मदत,अशा बहुउद्देशीय सागरी क्षेत्रासाठी या आधुनिक वाहनांचा वापर केला जाईल.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2067806)
Visitor Counter : 38