दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयटीयू-डब्ल्यूटीएसए 2024 च्या नवोन्मेष आदानप्रदान कार्यक्रमात उदयोन्मुख तंत्रज्ञानाना प्रोत्साहन

Posted On: 24 OCT 2024 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024

आयटीयू-डब्ल्यूटीएसए 2024 चा प्रमुख कार्यक्रम नवोन्मेष आदानप्रदान (इनोवेशन एक्सचेंज) कार्यक्रम, काल नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम जागतिक तांत्रिक सहकार्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो.

या कार्यक्रमाचा उद्देश उदयोन्मुख तंत्रज्ञानातील प्रमुख संकल्पनात्मक क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहयोग आणि नवोन्मेष वाढवणे हा होता. या कार्यक्रमात नवोन्मेष आणि जागतिक कौशल्य यांचे व्यापक आदानप्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात नेक्स्टजेन नेटवर्क्स (5G/6G), कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स, सुरक्षित कम्युनिकेशन नेटवर्क्स आणि क्वांटम कम्युनिकेशन्स या विषयावरील चर्चांचा समावेश होता.

वेगवान तांत्रिक प्रगतीमुळे जगभरातील विविध दृष्टीकोनांचा मेळ आवश्यक आहे  आणि म्हणूनच, प्रत्येक संकल्पनेत भारताबरोबरच  अमेरिका, ब्रिटन , संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर या इतर काही आयटीयू सदस्य देशांचा समावेश आहे. या चमूमध्ये एक प्रमुख प्राध्यापक, एक संशोधन करणारा विद्यार्थी आणि त्याच विषयासंबंधी क्षेत्रात काम करणारे स्टार्टअप समाविष्ट होते.

भारताचे दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात, गेल्या दशकभरात भारताने व्यवसाय आणि विशेषत: स्टार्टअप्सच्या वाढीसाठी अनुकूल अशी परिसंस्था तयार करण्यासाठी कसे अथक प्रयत्न केले आहेत याबद्दल माहिती दिली. भारत 6G आघाडी, उद्योगातील नेते, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ, स्टार्टअप्स आणि सरकार यांना एकत्र आणणारा एक महत्त्वाचे व्यासपीठ असून "भारत आणि जगासाठी, भारतात नवोन्मेष" या दृष्टीकोनाने प्रेरित  6G नवोन्मेष करण्यासाठी सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.

दूरसंचार विभागाच्या डिजिटल कम्युनिकेशन्स कमिशनच्या सदस्य (तंत्रज्ञान) मधू अरोरा यांनी आपल्या भाषणात , पुढील पिढीच्या तंत्रज्ञानामध्ये नवोन्मेष आणि स्टार्ट-अप परिसंस्थेला चालना देण्यासाठी खूप मोठे काम करणाऱ्या भारत सरकारच्या काही उपक्रमांचा उल्लेख केला.  या क्षेत्रांमध्ये भारतासोबत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाला (आयटीयूला) केले. या उपक्रमांमध्ये शंभर ‘5G यूज केस लॅब्स’, 5G इंटेलिजेंट व्हिलेज, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित  डिजिटल ट्विन्स यांचा समावेश आहे.

For regular updates, Follow DoT Handles

X - https://x.com/DoT_India

Insta- https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==

Fb - https://www.facebook.com/DoTIndia

YT- https://www.youtube.com/@departmentoftelecom]

 

S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2067717) Visitor Counter : 42