ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे शहरी भूमी अभिलेखांच्या सर्वेक्षण-पुनर्सर्वेक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे केले उद्‌घाटन

Posted On: 21 OCT 2024 7:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2024

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतील डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे दूरदृश्य प्रणाली मार्फत "शहरी भूमी अभिलेखांच्या सर्वेक्षण-पुनर्सर्वेक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर" या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्‌घाटन केले. शिवराज सिंह चौहान यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या बीजभाषणात जमिनीच्या गुणवत्तापूर्ण नोंदींचे महत्त्व अधोरेखित केले.डिजिटली अद्ययावत आणि पारदर्शक जमिनीच्या नोंदीमुळे जमिनीच्या संसाधनांचे अनुकूलन करणे तसेच धोरण निर्मिती आणि नियोजनात मदत करण्यासाठी विविध एजन्सींसोबत माहितीची देवाणघेवाण करणे सुलभ होते,असेही ते म्हणाले.

आपल्याला जगभरातील तज्ञांच्या उपस्थितीचा फायदा होईल आणि त्यांनी सादर केलेली माहिती आपल्याला जमीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास मदत करेल, असे चौहान यांनी सांगितले.

या कार्यशाळेचे पहिले सत्र, शहरी डिजिटल भूमी अभिलेखांची स्थापना आणि देखभाल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती, या विषयावर आधारित होते. या सत्रात जगभरातील अनेक देशांच्या भू-नोंदणी किंवा सर्वेक्षण विभागांनी सहभाग घेतला, यात दक्षिण कोरिया, स्पेन, नेदरलँड, फ्रान्स, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जपान, यूएसए, जर्मनी या देशांचा समावेश होता.  नोंदणी कायद्याचे महत्त्व, भूमापन, हवाई मॅपिंग आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) चे एकत्रीकरण तसेच अंमलबजावणी यावर या सत्रात विस्तृत चर्चा करण्यात आली.

ही कार्यशाळा म्हणजे, भारत सरकारची अनेक मंत्रालये आणि विभाग, 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे महसूल तसेच शहरी विकास सचिव, महापालिका आयुक्त, आंतरराष्ट्रीय तज्ञ, सुमारे 120 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे महापालिका अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी अशा अनेक भागधारकांचे अनोखे संमेलन आहे.

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2066803) Visitor Counter : 46