पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे दुसऱ्या 'सायलेंट कॉन्व्हर्सेशन: फ्रॉम मार्जिन टू द सेंटर’ या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन
हवामान बदल आणि जैवविविधता हानी रोखण्यासाठी सहअस्तित्व महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन
Posted On:
18 OCT 2024 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2024
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस. जयशंकर यांनी 17 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे दुसऱ्या "सायलेंट कॉन्व्हर्सेशन: फ्रॉम मार्जिन टू द सेंटर" या कला प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सांकला फाउंडेशन, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि आंतरराष्ट्रीय मार्जार (बिग कॅट) आघाडीच्या सहयोगातून केले आहे.
भारताचा विकासाचा मार्ग हा पर्यावरण संवर्धनाशी घनिष्टपणे निगडित आहे यावर डॉ. एस. जयशंकर यांनी उद्घाटनपर भाषणात भर दिला.
समुदाय निसर्गाशी सुसंवाद साधून त्याचे जतन आणि त्याच्याप्रती कसा आदर राखतात हे सहअस्तित्वाच्या भावनेतून प्रतीत होते असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे निदर्शनास आणले.
यावेळी "हिडन ट्रेझर्स: इंडियाज हेरिटेज इन टायगर रिझर्व्हज" या पुस्तकाचे आणि "बिग कॅट्स" या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले.
आदिवासी समुदायांच्या संवर्धनाची परंपरा जाणून हे समुदाय आणि पर्यावरण यांच्यातील सहजीवनावर प्रकाश टाकणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. प्रदर्शनात भारतातील 22 व्याघ्र प्रकल्पातील 200 हून अधिक चित्रे आणि 100 कलाकृती आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील 1,70,000 हून अधिक गावे वनक्षेत्राजवळ वसलेली आहेत आणि इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 सूचित करतो की 300 दशलक्षाहून अधिक लोक त्यांच्या उपजीविकेसाठी जंगलांवर अवलंबून आहेत.
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066064)
Visitor Counter : 46