दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘प्रसारण क्षेत्रातील उभरत्या पद्धती आणि तंत्रज्ञाने’ या विषयावर टीआरएआयतर्फे आयोजित परिसंवादाचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय व्यवहार राज्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 17 OCT 2024 3:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 17 ऑक्टोबर 2024

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय व्यवहार राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे ‘प्रसारण क्षेत्रातील उभरत्या पद्धती आणि तंत्रज्ञाने’ या विषयावर परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी-2024) च्या अनुषंगाने टीआरएआय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात टीआरएआयचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी; केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू तसेच टीआरएआयचे सचिव अतुल कुमार चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दूरसंचार उद्योगात नुकत्याच झालेल्या तंत्रज्ञानविषयक घडामोडी आणि आगामी काळात त्यांचा दिसणारा वाढता प्रभाव यांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

टीआरएआयचे सचिव अतुल कुमार चौधरी यांच्या हार्दिक स्वागतपर भाषणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आजचा परिसंवाद म्हणजे दूरसंचार क्षेत्रातील नव्या चर्चा आणि विचार मंथनाला प्रोत्साहन देणे, नुकत्याच झालेल्या घडामोडींच्या संदर्भात नियामकीय आराखड्यात आवश्यक असलेल्या बदलांवर कार्यवाही करणे या उद्देशाने टीआरएआय करत असलेल्या प्रयत्नांची पुढची पायरी आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे (एमआयबी) सचिव संजय जाजू यांनी त्यांच्या विशेष संबोधनात प्रसारण क्षेत्र सक्षम करण्याच्या उद्देशाने विकासाभिमुख धोरणे तसेच उपक्रम तयार करण्यात मंत्रालयाच्या भूमिकेवर अधिक भर दिला. स्पेक्ट्रमचा सर्वोत्तम वापर करून आवाजाचा अधिक उत्तम दर्जा प्राप्त करण्यासाठीचे किफायतशीर जनसंपर्क साधन म्हणून डिजिटल रेडिओची क्षमता त्यांनी ठळकपणे मांडली.कार्यक्रमांचे थेट मोबाईलवर वितरण शक्य करणाऱ्या डायरेक्ट टू मोबाईल (डी2एम) सेवेच्या लाभांविषयी देखील त्यांनी चर्चा केली. यासंदर्भात आयआयटी कानपूर आणि सांख्य लॅब्स यांच्या सहयोगाने प्रसारभारती विविध डी2एम चाचण्या घेत आहे असे त्यांनी संहोतले.त्यांनी 5जी तंत्रज्ञानाच्या परिवर्तनशील क्षमतेबाबत चर्चा केली. हे तंत्रज्ञान जेव्हा वाढीव सत्यता आणि आभासी सत्यता यांच्यासारख्या गहन तंत्रज्ञानांशी एकत्र केल्यावर मोठ्या प्रमाणात गुंगवून टाकणारा प्रसारण अनुभव देऊ शकतो असे त्यांनी सांगितले. त्यासोबतच, स्टार्ट अप संस्कृतीला चालना, सर्जनशीलतेची जोपासना आणि कार्यक्रमांचा अधिक उत्तम अनुभव मिअल्वून देण्याची क्षमता असलेल्या अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि विस्तारित सत्यता (एव्हीजीसी-एक्सआर)क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे से त्यांनी नमूद केले.

टीआरएआयचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी त्यांच्या बीजभाषणात माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील लक्षणीय वृद्धीची झेप अधोरेखित केली. नवनव्या माध्यम मंचाच्या वेगवान विस्तारामुळे  हे क्षेत्र 2026 पर्यंत 3.08 ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अधिक गुंगवून टाकणारा आणि संवादात्मक अनुभव देणाऱ्या गहन तंत्रज्ञानांच्या परिवर्तनकारी क्षमतेवर त्यांनी अधिक भर दिला. डायरेक्ट टू मोबाईल (डी2एम) प्रसारण सेवा आता इंटरनेट सेवा उपलब्ध नसताना देखील एकाचवेळी प्रसारणाला अनुमती देणारे पर्यायी कार्यक्रम वितरण तंत्रज्ञान म्हणून उदयाला येत आहे यावर त्यांनी अधिक भर दिला. तसेच, विशेष करून दूरचित्रवाणी सेवा जोडणी नसलेल्या भागात डिजिटल रेडिओ च्या उपयुक्ततेवर त्यांनी अधिक भर दिला. सर्व सेवा प्रदात्यांसाठी एकसमान पातळीवरील क्षेत्राची उपलब्धता सुनिश्चित करत आणि प्रसारण क्षेत्राच्या समग्र वाढीला प्रोत्साहन देत ग्राहक हिताचे संरक्षण करणाऱ्या भविष्यवेधी शिफारसी आणि नियम यांच्याप्रती टीआरएआयच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. राष्ट्रीय प्रसारण धोरण तयार करण्यासाठी टीआरएआयने नुकत्याच काही शिफारसी पाठवल्या आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय व्यवहार राज्यमंत्री डॉ.एल मुरुगन यांनी उद्घाटनपर भाषणात दर्शकांसाठी कार्यक्रम हे मुख्य लक्ष्य होत असण्यासह भारताच्या प्रसारण क्षेत्रावर तंत्रज्ञानातील प्रगातीच्या परिवर्तनकारी प्रभावावर अधिक भर दिला. असुरक्षित लोकसंख्येचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वर्तुळात समावेशन सुनिश्चित करण्यासाठी या जनतेला प्रसारण सेवांपर्यंत सुलभ पोहोच उपलब्ध करून देण्यात सुधारणा करण्याच्या गरजेवर देखील त्यांनी भर दिला. व्यापार करण्यातील सुलभता वाढवण्यासाठी सुरळीत एक-खिडकी यंत्रणेच्या माध्यमातून भारतात कार्यक्रम निर्मितीला चालना देण्यासाठी एव्हीजीसी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांनी केल्या. कार्यक्रम संचालित अर्थव्यवस्था म्हणून भारताचा झालेला विकास लक्षात घेत हा विकास कार्यक्रम सर्जकांसाठी लाभदायक असल्याचे त्यांनी सांगितले.स्थानिक कार्यक्रम निर्मितीला चालना आणि रोजगार संधींची निर्मिती या उद्देशाने देशातील 234 नव्या शहरांमध्ये एफएम रेडिओ वाहिन्या सुरु करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली याचा उल्लेख त्यांनी केला. सर्वांसाठी उच्च दर्जाच्या माध्यम कार्यक्रमांची उपलब्धता सुनिश्चित करत आर्थिक वृद्धी आणि सांस्कृतिक प्रसारात प्रसारण क्षेत्राची भूमिका बळकट करण्यासाठी तंत्रज्ञानविषयक प्रगतीचा वापर करण्याप्रती सरकारच्या वचनबद्धतेला त्यांनी दुजोरा दिला.

प्रसारणासाठीच्या वापराच्या विविध पद्धतींमध्ये गहन तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग आणि परिवर्तनकारी क्षमता यांचा शोध घेण्याच्या उद्देशाने आजचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यातील चर्चासत्रे तीन सलग सत्रांमध्ये विभाजित करण्यात आली होती. पहिले सत्र ‘प्रसारण विषयक परीदृश्यात गहन तंत्रज्ञानांचा वापर’ यावर आधारित होते तर ‘डी2एम आणि 5जी प्रसारण: संधी आणि आव्हाने’ या विषयावर दुसरे सत्र आधारित होते. शेवटचे सत्र ‘डिजिटल रेडिओ तंत्रज्ञान: भारतातील वापर विषयक धोरणे’ यावर आधारित होते.  दूरसंचार क्षेत्र, दूरचित्रवाणी तसेच रेडिओ प्रसारण यांच्याशी संबंधित समुदायातील तज्ञ वक्ते, साधने आणि नेटवर्क उत्पादक, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख वक्ते तसेच सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती यांचा या सत्रांतील वक्त्यांमध्ये समावेश होता. शंभराहून अधिक देशी-परदेशी प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले.

परिसंवादाविषयी माहिती/स्पष्टीकरण मिळवण्यासाठी टीआरएआयचे सल्लागार (बी आणि सीएस विभाग)दीपक शर्मा यांच्याशी advbcs-2@trai.gov.in.या मेल आयडीवर संपर्क साधता येईल.

Telecom Regulatory Authority of India

Symposium on

“Emerging Trends and Technologies in Broadcasting Sector”

 

17th October, 2024 (0900 – 1330 Hrs)

Venue: Session Hall – JAL, Hall No.5,

First Floor, Bharat Mandapam, New Delhi

 

Programme

 

0900 - 1000 Hrs

Inaugural Session

0900 - 0929 Hrs

Arrival of Dignitaries

0930 - 0932 Hrs

Lighting of the Lamp

0933 - 0936 Hrs

Welcome Address – Shri Atul Kumar Chaudhary, Secretary, TRAI

0937 - 0940 Hrs

Special Address – Shri Sanjay Jaju, Secretary, MIB

0941 - 0945 Hrs

Keynote Address – Shri Anil Kumar Lahoti, Chairman, TRAI

0946 - 0956 Hrs

Inaugural Address – Dr. L. Murugan, Hon’ble Minister of State for Information and Broadcasting and Parliamentary Affairs

0957 - 0958 Hrs

Presentation of Mementos to Dignitaries

0959- 1000 Hrs

Vote of Thanks – Ms. Vandana Sethi, Advisor, TRAI

1000 - 1015 Hrs

Tea Break

1015 - 1155 Hrs

Session 1: Use of Immersive Technologies in Broadcasting Landscape

Session Chair: Mr. Vishal Arya, Head of Technology, Tata Play Ltd.

  1. Mr. Alan Norman, Public Policy Director, Meta Platforms
  2. Dr. Bo Hagerman, Director Advance Technology, APAC, Ericsson
  3. Mr. Rrahul Sethi, Metaverse Expert and Founder, Metaverse911
  4. Mr. Ganesh Kumar, Sr. Solutions Architect, IMEA, Dolby Laboratories
  5. Mr. Siddharth Sharma, CEO, Bharti Telemedia Ltd
  6. Mr. Arunava Konar, Sr. Vice President Broadcast System & IT, ZEEL
  7. Mr. Ted Laverty, VP-Global Standards, Xperi
  8. Mr. Christian Simon, Business Development Asia & Europe, Fraunhofer IIS

1200 - 1240 Hrs

 

Session 2: D2M and 5G Broadcasting: Opportunities and Challenges

Session Chair: Mr. Ashok Kumar, DDG, DoT

  1. Mr. Pallab Dutta, Researcher, C-DOT
  2. Mr. Prashant Maru, AVP, Sales & Business Development, Tejas Networks
  3. Dr. Vinosh Babu James, Director, Technical Standards Qualcomm

 1245- 1325 Hrs

Session 3: Digital Radio Technology: Deployment Strategies in India

Session Chair: Mr. S.T. Abbas, DDG, DoT

  1. Mr. Alexander Zink, Chief Business Development Manager Digital Radio, Fraunhofer IIS
  2. Mr. Ashruf El-Dinary, Sr. VP, Xperi
  3. Mr. Yogendra Pal, Hon Chair India Chapter and Hon Member – DRMConsortium

 1325- 1330 Hrs

Closing Session – Shri Abhay Shanker Verma, Pr. Advisor, TRAI

 1330 Hrs onwards

 Lunch

********


H.Akude/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2065774) Visitor Counter : 12