नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या सातव्या सत्राला 120 सदस्य देशांचे नेते उपस्थित राहणार


‘आयएसए’चे सातवे सत्र 3 ते 6 नोव्हेंबर 2024 दरम्यान नवी दिल्ली येथे होणार

Posted On: 16 OCT 2024 9:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2024

इंटरनॅशनल सोलर अलायन्स (आयएसए) असेंब्ली, अर्थात आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या सातव्या सत्राचा उद्घाटनपूर्व कार्यक्रम आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात  60 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी या सभेचे अध्यक्षपद भूषवतील. आयएसए सभेचे सातवे सत्र खरोखरच जागतिक कार्यक्रम ठरणार आहे. भागीदार संस्था आणि भागधारकांसह 120 सदस्य आणि स्वाक्षरी करणाऱ्या देशांचे मंत्री, मिशन आणि प्रतिनिधी, ऊर्जा उपलब्धता, सुरक्षा आणि संक्रमण यात सुधारणा घडवणाऱ्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यावेळी एकत्र येतील.

भारताचे अध्यक्षपद आणि फ्रान्सच्या सहअध्यक्षपदाखाली, 03 ते 06 नोव्हेंबर 2024 या कालावधीत, भारतात नवी दिल्ली मध्ये  भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेचे सातवे सत्र आयोजित करण्यात आले आहे. 120 सदस्य आणि स्वाक्षरी करणाऱ्या देशांचे मंत्री, मिशन प्रमुख आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी, संभाव्य देश, भागीदार संस्था, खासगी क्षेत्र आणि प्रमुख भागधारक या सत्रात सहभागी होतील.

या सभेतील चर्चेचा भर, सदस्य देशांमध्ये, विशेषत: ऊर्जेची मर्यादित उपलब्धता असलेल्या प्रदेशांमध्ये सौर ऊर्जेच्या वापराला गती देण्यासाठी अवलंबली जाणारी साधने आणि पद्धती, या मुद्द्यांभोवती असेल. याशिवाय, उद्योजकांसाठी कौशल्य विकास आणि क्षमता विकास, निधी उपलब्ध करणे, आणि ऊर्जेचा स्रोत म्हणून सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचा प्रचार करणे, यासारख्या आयएसए च्या प्रमुख उपक्रमांची अद्ययावत माहिती या सत्रात सादर केली जाईल.

 

 

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2065615) Visitor Counter : 61