अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 17 ते 26 ऑक्टोबर 2024 या कालावधीतील मेक्सिको आणि अमेरिका दौऱ्यासाठी आज रात्री रवाना होणार
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2024 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2024
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन 16 ऑक्टोबर 2024 पासून मेक्सिको आणि अमेरिकेचा दौरा करणार आहेत.
17 ते 20 ऑक्टोबर 2024 या कालावधीत मेक्सिकोच्या त्यांच्या पहिल्या दौऱ्यात केंद्रीय अर्थमंत्री अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करतील ज्याद्वारे उभय देशांमधील वाढत्या द्विपक्षीय वित्तीय आणि व्यापारी संबंधांचा सकारात्मक मार्ग अधोरेखित होईल. ग्वाडालजारा येथे आपल्या दौऱ्याच्या प्रारंभी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन या तंत्रज्ञान धुरिणांच्या गोलमेज बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या बैठकीत ग्वाडालजारा येथे उपस्थित असलेल्या प्रमुख भारतीय आयटी दिग्गजांसह जागतिक तंत्रज्ञान धुरीण एकत्र येतील. त्यानंतर सीतारामन ग्वाडालजारा येथील टीसीएस मुख्यालयालाही भेट देतील. ही कंपनी मेक्सिकन आयटी परिसंस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी आणि मेक्सिकोची 'सिलिकॉन व्हॅली' म्हणून ओळखली जाणारी प्रमुख जागतिक आयटी आणि टेक कंपन्यांमधील महत्वपूर्ण कंपनी आहे.

सीतारामन मेक्सिकोचे अर्थ आणि सार्वजनिक पतपुरवठा मंत्री रोजेलिओ रामिरेझ दे ला ओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. याशिवाय, संसदीय सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री मेक्सिकन संसदेच्या अनेक सदस्यांशीही चर्चा करतील.
20 ते 26 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर असताना, सीतारामन या एफएमसीबीजी, पर्यावरण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची जी-20 संयुक्त बैठक; आणि जी-7-आफ्रिका मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकींमध्ये, चौथ्या जी-20 अर्थमंत्र्यांच्या आणि सेंट्रल बँक गव्हर्नर (एफएमसीबीजी) बैठकींमध्ये सहभागी होतील.
जागतिक बँक (डब्ल्यूबी), आशियाई विकास बँक (एडीबी), युरोपियन पुनर्रचना आणि विकास बँक (इबीआरडी) प्रमुखांसोबत तसेच बँकिंग आणि वित्तीय संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठकांबरोबरच केंद्रीय अर्थमंत्री युनायटेड किंग्डम, स्वित्झर्लंड आणि जर्मनीसह अनेक देशांसोबत द्विपक्षीय बैठकींमध्ये सहभागी होतील.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2065168)
आगंतुक पटल : 102