पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांना स्वामी समर्थांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून प्राप्त


त्यांचा आपल्या समाजाप्रती असलेला दृष्टिकोन साकारण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू : पंतप्रधान

Posted On: 14 OCT 2024 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज स्वामी समर्थांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून मिळाले.आपल्या समाजाप्रती असणारा त्यांचा दृष्टिकोन साकारण्यासाठी सरकार नेहमीच काम करेल,असे पंतप्रधानांनी  नमूद केले.

एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले:

“आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे... त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.”

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2064862) Visitor Counter : 43