आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते औषध नियामक प्राधिकरणांच्या 19 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन


"देशात सुरक्षित आणि प्रभावी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांना मान्यता देण्यासाठी आणि जगातील 200 हून अधिक देशांमध्ये निर्यात करण्यासाठी सीडीएससीओ द्वारे मजबूत प्रणाली विकसित"

Posted On: 14 OCT 2024 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत औषध नियामक प्राधिकरणांच्या 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीडीआरए) उद्घाटन केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेद्वारे (सीडीएससीओ) 14 ते 18 ऑक्टोबर दरम्यान भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नियामक प्राधिकरणे, धोरणकर्ते आणि 194 हून अधिक डब्ल्यूएचओ सदस्य देशांतील आरोग्य अधिकारी सहभागी झाले आहेत.

जगभरातील राष्ट्रांसाठी आवश्यक औषधे, लस आणि वैद्यकीय पुरवठा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अधोरेखित केले. आमचा विश्वास आहे की आमची प्रगती जगाच्या प्रगतीत सामावलेली आहे आणि म्हणूनच आम्ही जागतिक आरोग्य सुरक्षा आणि शाश्वततेकरिता योगदान द्यायला कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी नमूद केले.

"आयसीडीआरए मंच हा ज्ञानाची देवाणघेवाण, भागीदारीला चालना देत जगभरातील वैद्यकीय उत्पादनांची सुरक्षितता, परिणामकारकता आणि गुणवत्ता यांची खातरजमा करण्याकरिता नियामक चौकट विकसित करण्यासाठी जागा प्रदान करते” असे नड्डा यांनी उद्धृत केले.

सीडीएससीओच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना नड्डा म्हणाले की, "देशातील सुरक्षित आणि प्रभावी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांना मान्यता देण्यासाठी आणि जगातील 200 हून अधिक देशांमध्ये निर्यात करण्याकरिता सीडीएससीओ ने मजबूत प्रणाली विकसित केली आहे." परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधांच्या उपलब्धतेला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

"सध्या सीडीएससीओमध्ये 95% पेक्षा जास्त नियामक प्रक्रिया डिजिटल केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे पारदर्शकता आणि हितधारकांमधील विश्वास वाढला आहे" हे निदर्शनास आणताना “आरोग्य सेवा वितरणामध्ये वैद्यकीय उपकरणांचे महत्त्व लक्षात घेऊन, भारतातील वैद्यकीय उपकरण उद्योगाचेही नियमन केले जात आहे. चांगल्या उत्पादन पद्धतीविषयक मार्गदर्शक तत्त्वे अधिक व्यापक आणि डब्ल्यूएचओ-जीएमपी मार्गदर्शक तत्त्वांच्या समतुल्य बनवण्यासाठी औषध नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे याकडे केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष वेधले.

औषध पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी, औषध उत्पादनांच्या शीर्ष 300 ब्रँडवर बार कोड किंवा क्विक रिस्पॉन्स कोड (क्यूआर कोड) प्रदान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, भारतात आयात किंवा उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्व एपीआय पॅकवर क्यूआर कोड अनिवार्य असल्याचे देखील निदर्शनास आणून देण्यात आले.

डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस यांनी त्यांच्या भाषणात या महत्त्वपूर्ण जागतिक नियामक मंचाचे आयोजन केल्याबद्दल भारताचे कौतुक केले आणि विशेषत: प्रतिजैविक प्रतिकार, महामारी पश्चात जग आणि आरोग्य सेवेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित वापर यासारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर औषध नियमनात जागतिक सहकार्याचे महत्व अधोरेखित केले.

चर्चेचे मुख्य मुद्दे आणि नियामक आव्हाने

5-दिवसीय परिषदेत दृष्टिकोनाधारित सत्रांची मालिका असेल ज्यात नियामक अधिकारी आणि उद्योग धुरीण जागतिक औषध आणि वैद्यकीय उपकरण नियमनवर परिणाम करणाऱ्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करतील. काही प्रमुख सत्रांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • स्मार्ट नियमनावर पूर्ण सत्र: वैद्यकीय उपकरणांवर कार्यशाळा:
  • औषध निर्मितीतील प्रारंभिक सामग्रीची गुणवत्ता: आरोग्यसेवेत कृत्रिम बुद्धिमत्ता:
  • कोविड-19 महामारीला प्रतिसाद देण्यासाठी नियामक तयारी:

19 वी आयसीडीआरए भागीदारी आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे जागतिक नियामक प्रणाली मजबूत करण्यावर भर देईल. वैद्यकीय उत्पादनांसाठीच्या नियमनातील सुसंगतता, प्रतिजैविक प्रतिकार (एएमआर) आणि पारंपरिक औषधांना चालना देण्यासाठी आव्हाने आणि संधी यावर विविध राष्ट्रांतील नियामक प्राधिकरण अधिकारी चर्चा करतील.

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2064739) Visitor Counter : 55