पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2024 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची आज लाओ पीडीआरमधील व्हिएन्टियान येथे आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.
दोन्ही पंतप्रधानांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण, दुग्धव्यवसाय, कृषी तंत्रज्ञान, क्रीडा, पर्यटन, अंतराळ आणि जनसंबंध यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. ते म्हणाले की सातत्यपूर्ण उच्चस्तरीय संपर्कांमुळे द्विपक्षीय संबंधांना मजबूत गती मिळाली आहे. या संदर्भात त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींच्या नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्याचे स्मरण केले, जे खूप मोठे यश होते.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्याच्या न्यूझीलंडच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी स्वागत केले. पंतप्रधानांनी बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या आणि भारत-न्यूझीलंड संबंधांना अधिक उंचीवर नेण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.पंतप्रधानांनी पंतप्रधान लक्सन यांना परस्परांच्या सोयीस्कर तारखेला भारताला भेट देण्याचे आमंत्रण दिले, जे त्यांनी स्वीकारले.
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2063998)
आगंतुक पटल : 99
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam