रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पायाभूत सुविधा विकासात नोंदवली उत्कृष्ट कामगिरी
Posted On:
08 OCT 2024 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2024
नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL), अर्थात राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास मंडळ, या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया अंतर्गत शेड्यूल 'A' CPSE कंपनीने या वर्षी पुन्हा एकदा 13 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या (ईशान्येकडील राज्ये, जम्मू आणि काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार बेटे आणि उत्तराखंड) पायाभूत सुविधा विकासात आणि या राज्यांमधील कनेक्टीव्हिटी (दळणवळण) आणि जनतेचे जीवनमान सुधारण्यात उत्तम कामगिरी नोंदवली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात NHIDCL ने या राज्यांमध्ये 20,851 कोटी रुपये खर्च करून 1,160 किमी महामार्ग आणि अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प अमलात आणले. कंपनीने प्रति समभाग 5.30 रुपये, असा एकूण 54.59 कोटी रुपये लाभांश देखील घोषित केला.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2063304)
Visitor Counter : 47