पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत जाहीर
Posted On:
04 OCT 2024 10:52AM by PIB Mumbai
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.
आपल्या एक्सपोस्टवर त्यांनी लिहिले आहे
"उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झालेला रस्ता अपघात हा अत्यंत वेदनादायी आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबियांप्रती माझ्या मनोमन सहसंवेदना. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना ईश्वर देवो. यासोबतच सर्व जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, ही प्रार्थना. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, पीडितांना स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे.
मिर्झापूर, यूपी येथील दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना PMNRF मधून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पोस्ट केले
मिर्झापूर, यूपी येथील दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना PMNRF मधून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
***
SonalT/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2061895)
Visitor Counter : 50
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam