कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

कृषी भवनात सफाई मित्रांच्या मुलांसाठी "स्वच्छता ही सेवा- 2024" बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन  आणि  सफाई मित्रांचा सत्कार

Posted On: 02 OCT 2024 11:59AM by PIB Mumbai

 

कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता' या संकल्पनेवर आधारित  स्वच्छता ही सेवा, 2024 अभियानात  त्याच्या देशभरातील सर्व अधीनस्थ/संलग्न/स्वायत्त संस्था/सार्वजनिक उपक्रम/ क्षेत्रीय कार्यालयांसह  हिरीरीने सहभागी होत आहे.

सफाई मित्र हे पर्यावरण व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत आणि ते काम करण्यासाठी निरोगी आणि स्वच्छ वातावरण प्रदान करतात. विभागाच्या हित -कल्याणातील महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. . या कार्यक्रमात 150 हून अधिक सफाई मित्रांचा सत्कार करण्यात आला.

याशिवाय 21 सप्टेंबर 2024 रोजी कृषी भवनात सफाई मित्रांच्या मुलांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षीस वितरण समारंभही आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी आणि विभागाच्या अतिरिक्त सचिव  शुभा ठाकूर उपस्थित होते.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2061057) Visitor Counter : 33