कृषी मंत्रालय
कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग-भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्वच्छतेसाठी राबविली ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम आणि ‘विशेष मोहीम 4.0’
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2024 1:14PM by PIB Mumbai
नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी हाती घेतलेल्या मोहीमेचा भाग म्हणून, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग-भारतीय कृषी संशोधन परिषदेने ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘विशेष मोहीम 4.0’ अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले होते. या उपक्रमात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विविध संस्थांनी घेतला होता.

ईशान्य क्षेत्रातील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या काही संस्थांनी आपल्या परिसरातील गावांना त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत माहिती दिली. या मोहिमेत, स्थानिक बाजारपेठेतील निवडक ठिकाणी, जेथे कचऱ्याची खूप जास्त निर्मिती होते, तेथे कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. या संस्थेतील अधिकाऱ्यांनी स्थानिकांना आणि दुकानदारांना सुका आणि ओला कचरा व्यवस्थापन तसेच पुनर्वापर पद्धतींबाबत माहिती दिली. गावातील प्रमुख ठिकाणी स्वच्छतेबाबतचे फलक लावून शेतकरी आणि ग्रामस्थांना स्वच्छता आणि साफसफाईचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांमध्ये मानसिक आणि शारीरिक स्वच्छतेच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्थांमधील तज्ञांनी खेडेगावातील कामगारांना चांगले आरोग्य तसेच आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. याशिवाय घरांमध्ये स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि सामुदायिक वातावरण स्वच्छ राखण्यासाठीच्या व्यावहारिक उपायांवर चर्चा करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व देखील लोकांना सांगितले. निर्मळ, तणावमुक्त मन हे सर्वांगीण आरोग्यासाठी शारीरिक स्वच्छतेइतकेच महत्त्वाचे आहे, ही कल्पनाही समजावून सांगितली. या मोहिमेच्या महत्वपूर्ण संदेशांनी स्थानिक जनतेला स्वच्छ, आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी निरोगी, शाश्वत सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहित केले. हा उपक्रम व्यापक ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा एक भाग असून शिक्षण आणि परस्पर संवादाद्वारे ग्रामीण जनतेच्या वर्तणुकीतील स्वच्छतेविषयी सकारात्मक बदलांना चालना देण्याचा प्रयत्न करतो.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2059823)
आगंतुक पटल : 75