पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आर्थिक विकासाचा पर्यटन उद्योगाशी अन्योन्य संबंध: उपराष्ट्रपती जगदीप धनखड


पर्यटन आपल्या सर्वांना जोडते आणि संस्कृती आणि राष्ट्रांमधील दुवा सांधते: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकरिता माहितीपुस्तिकेचे प्रकाशन

पर्यटन मंत्रालयाच्या “चलो इंडिया” मोहिमेअंतर्गत येणाऱ्या परदेशी व्यक्तींना 1,00,000 निःशुल्क व्हिसाची घोषणा

Posted On: 27 SEP 2024 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2024

 

उपराष्ट्रपती, जगदीप धनखड यांनी 27 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवन, येथे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या जागतिक पर्यटन दिन सोहळ्यात सहभाग घेतला. ‘पर्यटन आणि शांतता’ही यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना आहे.

 

या समारंभात उपराष्ट्रपतींनी पर्यटन मंत्रालयाच्या विविध उपक्रमांचे अनावरण केले.

  • पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी या उपक्रमाचा आरंभ - 50 पर्यटन स्थळांवर राष्ट्रीय जबाबदार पर्यटन उपक्रम
  • आघाडीचे 8 आदरातिथ्य समूह आणि 21 केंद्रीय हॉटेल व्यवस्थापन संस्था यांच्यात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
  • सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 च्या विजेत्यांची घोषणा
  • पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी माहितीपुस्तिकेचे प्रकाशन 
  • इन्क्रेडिबल इंडिया कंटेंट हब आणि डिजिटल पोर्टलचा शुभारंभ

पर्यटनात आदरातिथ्य आणि सेवा उत्कृष्टतेची सर्वोच्च मानके साध्य करण्याच्या महत्त्वावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी बोलताना भर दिला. गेल्या दहा वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट करणे, संपर्कव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सेवा सुविधा प्रदान करणे, महामार्ग, जगातील सर्वोत्कृष्ट दर्जाचे द्रुतगती महामार्ग याद्वारे झालेल्या परिवर्तनाचा पर्यटनावर कसा प्रभावशाली परिणाम झाला यावर त्यांनी प्रकाश टाकला. आर्थिक विकास हा पर्यटन उद्योग आणि पर्यटनाशी जोडलेला आहे, यावर त्यांनी भर दिला. सामाजिक विकास साध्य करण्यासाठी जागतिक आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, सांस्कृतिक आदानप्रदान यावर पर्यटनाचा प्रभाव आणि समुदायाच्या विकासामध्ये पर्यटनाचा एक साधन म्हणून होत असलेला वापर याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 च्या विजेत्यांचे उपराष्ट्रपतींनी अभिनंदन केले. पर्यटन क्षेत्र आपल्या सर्वांना जोडते आणि संस्कृती व राष्ट्रांमधील दुवा सांधते असे प्रतिपादन पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी भाषणात केले. पंतप्रधानांनी पुढाकार घेतलेल्या ‘संपूर्ण सरकार’ दृष्टिकोनाचा पर्यटनावरील सकारात्मक परिणाम शेखावत यांनी अधोरेखित केला. सुमारे 1,50,000 किलोमीटर रस्त्यांचे जाळे, वर्धित हवाई कनेक्टिव्हिटीसाठी ~ 500 नवीन हवाई मार्ग आणि ~ 150 नवीन विमानतळे, जलदगती वंदे भारत गाड्यांची सुरुवात, सुमारे 100 पर्यटन पायाभूत सुविधा प्रकल्पांची पूर्तता, जागतिक स्तरावर 60 हून अधिक स्थळांना ओळख मिळवून देणारे जी-20 चे अध्यक्षपद, स्वच्छ भारतमुळे स्वच्छ स्थळे, युपीआयद्वारे सुधारित सुविधा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या सर्वांमुळे तसेच  'संपूर्ण सरकार' दृष्टिकोनामुळे पर्यटनाने नवीन उच्चांक गाठल्याचे शेखावत यांनी नमूद केले.

पर्यटन मंत्रालयाकडून लवकरच पर्यटन स्थळांची बृहद यादी प्रसिद्ध केली जाईल, ज्यामध्ये पुढील 3 वर्षांत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सक्रिय सहयोगातून संस्कृती मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय यांच्या समन्वयाने देशभरात विकसित होणाऱ्या पर्यटन स्थळांची प्राधान्य यादी प्रकाशित करण्याची घोषणा शेखावत यांनी केली. खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना सरकारच्या प्रयत्नांना पूरक असा त्यांच्या भविष्यातील गुंतवणुकीचा मार्ग सक्षम करण्यासाठी ही बृहद यादी सार्वजनिक केली जाईल, असाही उल्लेख त्यांनी केला. 

पर्यटन मंत्रालयाच्या 'चलो इंडिया' अभियानाद्वारे जागतिक भारतीय समुदाय अतुल्य भारताचे राजदूत बनण्यास सक्षम करण्यासाठी, 'चलो इंडिया' अभियानांतर्गत भारतात येणाऱ्या पहिल्या 1,00,000 परदेशींना भारत सरकार त्यांचा व्हिसा निःशुल्क प्रदान करेल आणि व्हिसा शुल्क माफ करेल याकडे शेखावत यांनी  लक्ष वेधले. 

  

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी 'India By Air इंडिया बाय एअर' या संकल्पनेवर आधारित भाषण केले. उडान (प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना), डिजी यात्रा, विमानतळांची वाढलेली संख्या आणि इतर उपक्रमांद्वारे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या प्रयत्नांच्या परिणामाची माहिती देताना त्यांनी पर्यटन वाढ हवाई कनेक्टिव्हिटीवर कशी अवलंबून आहे हे अधोरेखित केले. 

 

* * *

S.Kakade/Bhakti/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2059663) Visitor Counter : 16


Read this release in: English , Hindi , Tamil