आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली यकृतात अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या बिगर अल्कोहोलिक (Non-Alcoholic Fatty Liver Disease - NAFLD) आजाराशी संबंधित सुधारित उपचार कार्यपद्धतीची मार्गदर्शक तत्वे आणि प्रशिक्षण प्रारुप
Posted On:
27 SEP 2024 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2024
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यकृतात अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या बिगर अल्कोहोलिक (Non-Alcoholic Fatty Liver Disease - NAFLD) आजाराशी संबंधित सुधारित उपचार कार्यपद्धतीची मार्गदर्शक तत्वे आणि प्रशिक्षण प्रारुप आज जारी केले. नव्या पारुपाच्या या दस्तऐवजांमध्ये यकृतात अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या बिगर अल्कोहोलिक आजाराने ग्रस्त रुग्णांची सेवा, आणि उपचारानंतरची परिणामकारता सुधारण्यासाठी माहितीपूर्ण, आणि वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध झालेल्या वस्तुनिष्ठ उपचार - कार्यपद्धतींचा अंतर्भाव केला गेला आहे.
यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी संबोधित केले. यकृतात अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या बिगर अल्कोहोलिक आजाराचा, असंसर्गजन्य रोगांच्या (Noncommunicable Diseases - NCD) वर्गवारीतील मुख्य आजार म्हणून मान्यता मिळावी यासाठीच्या प्रयत्नांमध्ये भारताने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अलिकडच्या काळात यकृतात अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या बिगर अल्कोहोलिक आजार वेगाने वाढत असून, त्यामुळेच हा आजार सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेच्या परिघातला चिंतेचा विषय झाला असल्याचे ते म्हणाले. हा आजार चयापचय विकारांशी संबंधित असलेल्या लठ्ठपणा, मधुमेह तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांशी निगडीत आजार असल्याचेही ते म्हणाले. सद्यस्थितीत 10 पैकी एक ते तीन जण यकृतात अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या बिगर अल्कोहोलिक आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता आहे, यावरूनच आपल्याला या आजाराच्या प्रभावाची व्याप्ती समजून घेता येऊ शकेल असे ते म्हणाले.
या आजाराला आळा घालण्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्वाचे काम मानले आहे. आज जारी केलेले सुधारित उपचार कार्यपद्धतीची मार्गदर्शक तत्वे आणि प्रशिक्षण प्रारुप हे त्याचेच द्योतक आहे असेही केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी यावेळी सांगितले. या महत्वाच्या दस्तऐवजांमुळे सामुदायिक आरोग्यविषयक उपक्रमासाठी काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व स्तरातील आरोग्यविषयक कर्मचाऱ्यांसाठी एक कृतीशील आराखडाच उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी असंसर्गजन्य आजारांचे निदान झालेल्या लोकांनी अधिक सजग राहावे असे आाहनही केले. त्यासोबतच यकृतात अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या बिगर अल्कोहोलिक आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची आवश्यकताही त्यांनी अधोरेखित केली.
यकृतात अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या बिगर अल्कोहोलिक आजार झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आणि त्यांची योग्य आरोग्यविषक निगा राखणे अत्यंत महत्वाचे आहे. याचीच सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, आरोग्यविषयक निगा राखण्यावर आणि आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान करण्यावर भर दिला गेला आहे. या दस्तऐवजाच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यकृतात अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या बिगर अल्कोहोलिक आजाराने ग्रस्त व्यक्तीला सर्वंकष रुग्णसेवा देता यावी यादृष्टीने वैद्यकीय क्षेत्राच्या विविध शाखांमधील आरोग्य सेवा प्रदात्यांच्या उपचार प्रक्रियांचे एकात्मिकीकरण करण्यासारख्या बहुआयामी दृष्टिकोनाला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
यकृतात अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या बिगर अल्कोहोलिक आजाराचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी, या आजाराविषयी योग्य माहितीचे आकलन असणे गरजेचे आहेच, आणि त्या सोबतच या आजारावर उपचार म्हणून सर्व स्तरालीवर आरोग्यविषयक व्यवस्थांमध्ये वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध झालेल्या वस्तुनिष्ठ उपचार - कार्यपद्धती अमलात आणण्याची क्षमता घडवणेही तितकेच महत्वाचे आहे.
* * *
S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2059541)
Visitor Counter : 53