सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते 28t सप्टेंबर 2024 रोजी पुण्यात 20 व्या दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन होणार


व्होकल फॉर लोकल या चळवळीचे मूर्त रूप असलेल्या या मेळाव्यात देशभरातील सुमारे 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 100 दिव्यांग कारागीर, कलाकार आणि उद्योजक विविध प्रकारची उत्पादने आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवणार

Posted On: 27 SEP 2024 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2024

 

महाराष्ट्रात पुण्यामध्ये पिंपरी - चिंचवडमधल्या नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी  मैदनात उद्या दि. 28 सप्टेंबरपासून दिव्य कला मेळाव्याला सुरुवात होणार आहे. हा मेळावा  6 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरु असेल. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होईल. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील दिव्यांग जन सक्षमीकरण विभागाच्या वतीने  आणि राष्ट्रीय दिव्यांगजन वित्त आणि विकास महामंडळ (NDFDC) या दिव्यांग जन सक्षमीकरण विभागाच्या अखत्यारीतील सर्वोच्च महामंडळाच्या सहकार्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभरातील दिव्यांग (अपंग व्यक्ती) घटकातील कारागीर, कलाकार आणि उद्योजकांच्या कारागिरी, सर्जनशीलता आणि उद्योजकवृत्तीला सन्मान देण्याचा एक अनोखा उत्सव म्हणून या दिव्य कला मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे. या मेळाव्यात देशभरातील 20 पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 100 दिव्यांग व्यक्तींनी केलेल्या, घरांची सजावट, कपडे, कारकूनी कामासाठीचे पर्यावरणपूरक साहित्य,  खेळणी आणि वैयक्तिक वापराच्या गोष्टी अशा विविध उत्पादनांमधील त्यांच्या निवडक साधन संग्रहाचे प्रदर्शनही आयोजित केले आहे. या मेळाव्याला भेट देणाऱ्यांना सेंद्रिय उत्पादनांपासून बनवलेले  पाकिटबंद  खाद्यपदार्थ, हातमाग आणि उत्कृष्ट भरतकाम पाहण्याची संधी मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या go vocal for local या संकल्पनेच्या अनुषंगाने समांतर जाणाऱ्या संकल्पनेवरच या मेळाव्याचे नियोजन केले गेले आहे. दिव्यांग कारागिरांना त्यांच्या उत्पादनांचे विपणन  आणि प्रसार करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हे या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये याआधीच असे  मेळावे यशस्वीरित्या आयोजित केले गेले आहेत. आता त्याच मालिकेअंतर्गत या मेळाव्यानिमित्त  पुण्यातही विविधता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकतेचा आणखी एक भव्य सोहळा साजरा होणार आहे.

दररोज सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत या मेळाव्याला भेट देता येईल. या मेळाव्यात दिव्यांग तसेच नामांकित व्यावसायिक कलाकारांचे कलाविषयक सादरणीकरणाचे कार्यक्रमही होणार आहेत.  यासोबतच 6 ऑक्टोबर 2024 रोजी मेळाव्याच्या ठिकाणी दिव्य कला शक्ती या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात  देशभरातील प्रतिभावान दिव्यांग कलाकारांच्या कलेचे सादरीकरण होणार आहे. हा मेळावा विविधांगी सांस्कृतिक अनुभव देणारा ठरणार आहे. 

 

* * *

S.Kakade/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2059525) Visitor Counter : 45


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil