संरक्षण मंत्रालय
हिंद महासागर रिम संघटनेच्या परिसंवादाचे दुसरे पर्व
Posted On:
27 SEP 2024 12:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2024
हिंद महासागर रिम संघटनेच्या (Indian Ocean Rim Association - IORA) बेकायदेशीर,नोंद न झालेल्या आणि अनियमित (Illegal, Unreported and Unregulated - IUU)मासेमारी या विषयावरच्या चर्चासत्राचे दुसरे पर्व दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी गोवा येथील नौदल युद्धप्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित केले गेले होते. या चर्चासत्रात हिंद महासागर क्षेत्रातील बेकायदेशीर,नोंद न झालेल्या आणि अनियमित मासेमारीच्या घटना, त्याच्या आर्थिक - पर्यावरणीय आणि सुरक्षा क्षेत्रावरील परिणामांचा आढावा घेतला गेला. यासोबतच अशा घटना रोखण्यासाठी हिंद महासागर क्षेत्रातील सदस्य देशांद्वारे अमलात आणता येऊ शकतील अशा प्रकारच्या उपाययोना अशा विविध मुद्यांवरही या चर्चासत्रात विस्तृत चर्चा केली गेली.
हिंद महासागर क्षेत्राअंतर्गतच्या 17 देशांचे प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. यात ऑस्ट्रेलियासह, बांगलादेश, फ्रान्स, इंडोनेशिया, केनिया, मादागास्कर, मोझांबिक, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, ओमान, सोमालिया, दक्षिण आफ्रिका, सेशेल्स, श्रीलंका, थायलंड आणि टांझानिया या देशांचा समावेश होता. सर्व सहभागी देशांच्या प्रतिनिधींनी हिंद महासागर क्षेत्रातील बेकायदेशीर,नोंद न झालेल्या आणि अनियमित मासेमारीच्या घटनांच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासंबंधीच्या चर्चांमध्ये सहभाग घेतला.
* * *
S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2059348)
Visitor Counter : 43