पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेअंतर्गत 80 कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट केले साध्य
80 कोटी रोपांचे उद्दिष्ट मुदतीच्या 5 दिवस आधीच गाठले
Posted On:
25 SEP 2024 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2024
पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 'एक पेड माँ के नाम' वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत एक महत्त्वाचे उद्दिष्ट गाठले आहे. सप्टेंबर 2024 पर्यंत 80 कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. आज हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सरकारी संस्था, गाव पातळीवरील संस्था, स्थानिक लोक आणि इतर भागधारक यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.
जागतिक पर्यावरण दिनी 5 जून 2024 रोजी, एक पेड माँ के नाम ही एक विशेष देशव्यापी वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेअंतर्गत, नागरिकांना त्यांच्या मातेविषयी माया, आदर आणि सन्मान म्हणून तसेच झाडे आणि पृथ्वी मातेचे रक्षण करण्याचा संकल्प म्हणून वृक्षारोपणास प्रोत्साहित करण्यात आले. या मोहिमेचा उद्देश जमिनीचा ऱ्हास थांबवणे आणि निकृष्ट जमीन पुनर्संचयित करणे हा आहे.
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2058711)
Visitor Counter : 71