आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने “विकसित भारत 2047” उद्दिष्ट पूर्तीच्या मार्गावर आरोग्य सेवा नवोन्मेष, महामारीला तोंड देण्याची तयारी आणि स्वदेशी वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी परिवर्तनात्मक पावले उचलली आहेत: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2024 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'विकसित भारताचे’ स्वप्न 2047 पर्यंत साकार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या, आरोग्य संशोधन विभागाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणीची घोषणा केली. "हे उपक्रम आरोग्य सेवा नवोन्मेष, साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी सज्जता आणि स्वदेशी वैद्यकीय पर्यायांचा विकास, आरोग्यदायी, अधिक लवचिक आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत योगदान देणारी परिवर्तनात्मक पावले दर्शवतात.", असे नड्डा यांनी अधोरेखित केले.
आरोग्य संशोधन विभागाने गेल्या 100 दिवसांत हाती घेतलेले काही प्रमुख आणि यशस्वी उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
- मेड-टेक मित्र: हा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संस्था यांचा संयुक्त उपक्रम आहे. या व्यासपीठाद्वारे 250 हून अधिक नवोन्मेषक, स्टार्ट-अप आणि उद्योग भागीदार जोडले गेले आहेत, जे त्यांना नियमन अनुरूप उत्पादने विकसित करण्याच्या, त्यांचे नैदानिक प्रमाणीकरण आणि स्केलिंग-अप प्रक्रियेतील आव्हानांवर मात करण्यास मदत करतात.
- महामारीला तोंड देण्याच्या तयारीसाठी राष्ट्रीय वन हेल्थ मिशन (NOHM): हे मिशन मानवाला पशु आणि पर्यावरणामुळे होणाऱ्या रोगांचे आणि साथीच्या रोगांचे व्यवस्थापन करण्याची भारताची क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- एकात्मिक संशोधन आणि निदान प्रयोगशाळा (IRDLs): निधी पुरवठ्याद्वारे देशभरात विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा (VRDLs) मजबूत करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
- दुर्मिळ आजारांसाठी स्वदेशी औषधांच्या विकासासाठी कार्यक्रम: परवडणाऱ्या आरोग्यसेवेमध्ये जागतिक स्तरावर आघाडी मिळवण्याच्या भारताच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, आरोग्य संशोधन विभाग 8 दुर्मिळ आजारांवर उपचारांसाठी 12 स्वदेशी औषधे विकसित करणारा हा कार्यक्रम सुरू करणार आहे.
- “जगात प्रथम” आव्हान: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेपासून प्रेरित होऊन, “जगात प्रथम” आव्हान स्विकारणाऱ्या जैव वैद्यकीय संशोधनातील 50 उच्च-जोखीम, उच्च- पुरस्कार नवोन्मेषांना निधी दिला जाईल.
- पुरावा-आधारित मार्गदर्शक तत्त्वांसाठी केंद्र: सेंटर फॉर एव्हिडन्स फॉर गाईडलाइन्स, उद्घाटनासाठी सज्ज असलेले पुरावा-आधारित मार्गदर्शक तत्त्वांसाठी केंद्र आवश्यक ती सर्वोच्च मानके सुनिश्चित करून, देशभरातील वैद्यकीय पद्धतींचे मानकीकरण करण्यात मदत करेल. जागतिक दर्जाची, पुराव्यावर आधारित राष्ट्रीय आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात हे केंद्र उपयुक्त ठरेल.
- संशोधनापासून कार्यान्वयनापर्यंतचे कार्यक्षेत्र: आरोग्य संशोधन विभागात “संशोधनापासून कार्यान्वयनापर्यंत” कार्यक्षेत्र स्थापना केल्याने हेच निश्चित होईल की अत्याधुनिक आरोग्य संशोधन धोरण आणि व्यवहारात अखंडपणे एकीकृत केले जाईल.
- संशोधन क्षमता निर्माण: वैद्यकीय संशोधन विद्याशाखेच्या पहिल्या तुकडीत विविध भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद संस्थांमध्ये वैद्यकीय संशोधनात पीएचडीसाठी आतापर्यंत एकूण 93 फेलोची नोंदणी झाली आहे.
वरील सर्व उपक्रम ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते सुरू होणार आहेत.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2058029)
आगंतुक पटल : 104