संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते जयपूरच्या सैनिक शाळेचे औपचारिक उद्घाटन


“सैनिक शाळा शैक्षणिक ज्ञान देण्याबरोबरच तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी शिस्त, देशभक्ती आणि धैर्य ही मूल्ये रुजवतात”

Posted On: 23 SEP 2024 5:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 सप्‍टेंबर 2024

 

संपूर्ण भारतामध्ये भागीदारी पद्धतीने 100 नवीन सैनिक शाळा उभारण्याच्या सरकारच्या संकल्पनेनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी राजस्थानमधील जयपूर येथे सैनिक शाळेचे औपचारिक उद्घाटन केले. संरक्षण मंत्रालयाने राज्य सरकार, स्वयंसेवी संस्था आणि खाजगी शाळा यांच्या सहयोगातून 100 शाळांपैकी 45 शाळांना मान्यता दिली आहे. यापैकी चाळीस (40) शाळा कार्यरत असून, जयपूरची सैनिक शाळा त्यातील एक आहे.

राज्याच्या देशभक्त तरुणांसाठी ही शाळा वरदान ठरेल, कारण त्यांना सशस्त्र दलात सामील होऊन देशाची सेवा करण्याकरिता योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. 

पीपीपी -मॉडेल म्हणजे सामान्यतः 'सार्वजनिक-खाजगी-भागीदारी' असे मानले जाते, परंतु सहयोगाची मानक व्याख्या आता बदलत असून 'खाजगी-सार्वजनिक-भागीदारी' म्हणून त्याकडे पाहिले जात असल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. “खाजगी क्षेत्र आता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चालकाच्या आसनावर असून ते कृषी, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. या नवीन सैनिक शाळांद्वारे, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र एकत्र येतील आणि आपल्या भावी पिढ्यांना सर्वोत्तम शिक्षण देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

राष्ट्राच्या विकासात शिक्षण हा सर्वात मूलभूत घटक असल्याचे सांगून, संरक्षण मंत्र्यांनी मुलांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास सुनिश्चित करण्यासाठी आणि भविष्यातील सशक्त पिढी घडवण्यासाठी सैनिक शाळांद्वारे केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. सैनिक शाळा केवळ शैक्षणिक ज्ञानच देत नाहीत, तर शिस्त, देशभक्ती आणि धैर्य ही मूल्ये रुजवतात हे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास त्यांना देशाच्या प्रगतीची प्रेरणा देतो, असेही ते म्हणाले.

केवळ सशस्त्र दलच नव्हे तर सैनिक शाळांचे विद्यार्थी इतर कोणतेही करिअर निवडू शकतात आणि त्यांच्या पद्धतीने देशाची सेवा करू शकतात असेही त्यांनी नमूद केले. कधीही हार न मानता इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

भागीदारी तत्वावरील  100 नवीन सैनिक शाळा या पूर्वीच्या पद्धतीनुसार कार्यरत असलेल्या विद्यमान 33 सैनिक शाळांव्यतिरिक्त आहेत. या नवीन शाळा, संबंधित शिक्षण मंडळांच्या संलग्नतेव्यतिरिक्त, सैनिक शाळा सोसायटीच्या अधिपत्याखाली काम करतील आणि त्यांच्या नियम आणि नियमनांचे पालन करतील. त्यांच्या नियमित संलग्न बोर्ड अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, ते सैनिक शाळेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिक्षण देतील.

या अभ्यासक्रमात मूल्य-आधारित उपक्रमांचा समावेश आहे जसे की स्त्री-पुरुष समानता आणि पर्यावरण संरक्षण, कौशल्य-आधारित प्रशिक्षण, शाळाबाह्य उपक्रम, समुदाय सेवा, शारीरिक प्रशिक्षण, एनसीसी, पर्यटन आणि सहली आणि प्रेरणादायी चर्चा  यासारख्या मुद्द्यांवर वादविवाद स्पर्धा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची खातरजमा करून त्यांना राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देणारे सदस्य बनवणे शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे. 

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2057954) Visitor Counter : 65


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu