मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या आठव्या भारत जल सप्ताह 2024 प्रदर्शनात, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, भागीदार विभाग म्हणून सहभागी

Posted On: 21 SEP 2024 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आठव्या भारत जल सप्ताह 2024 चे उद्घाटन केले. प्रगती मैदानावर 17 ते 20 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित या आठव्या भारत जल सप्ताह 2024 प्रदर्शनात पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने (DAHD) भागीदार विभाग म्हणून भाग घेतला.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे (DAHD) आयोजित या प्रदर्शनात "पशुधन क्षेत्रातील पाण्याच्या पाऊलखुणा " ही संकल्पना आणि भारतीय परिदृश्यात पशुधन तसेच कुक्कुटपालन या व्यवसायांवर होणारा त्याचा परिणाम प्रदर्शित करण्यात आला. विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्य योजना आणि उपक्रम तसेच त्यातील कामगिरी देखील पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या स्टॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे प्रदर्शन ‘शाश्वत विकासाच्या सहाव्या उद्दिष्टाशी संबंधित आहे, ज्याचा उद्देश सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छतेची उपलब्धता आणि शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चित करणे हे आहे.

   

जलशक्ती मंत्रालयाने 17-20 सप्टेंबर 2024 दरम्यान भारतीय जल सप्ताह-2024 चे आयोजन केले होते. हा कार्यक्रम जागतिक स्तरावरील निर्णयकर्ते, राजकारणी, संशोधक, तज्ञ, नियोजक, जगभरातील जलस्रोत क्षेत्रातील नवोन्मेषक, विद्यार्थी आणि भागधारक यांच्याकडून कल्पना आणि मते जाणून घेण्यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून काम करतो. या कार्यक्रमात "समावेशक जल विकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी आणि सहकार्य" या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. 

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2057368) Visitor Counter : 23