कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘स्वच्छता ही सेवा-2024’ मोहिमेत कृषी आणि कृषक कल्याण विभागाचा उत्साही सहभाग

Posted On: 21 SEP 2024 3:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2024

 

‘स्वच्छता ही सेवा-2024’ मोहिमेत कृषी आणि कृषक कल्याण विभाग उत्साहाने सहभागी होत आहे. 'स्वच्छता ही सेवा-2024' मोहिमेदरम्यान मंत्रालयाच्या देशभरातील सर्व अधीनस्थ / संलग्न / स्वायत्त संस्था / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि क्षेत्रीय कार्यालये स्वच्छतेशी संबंधीत सुमारे 600 उपक्रम हाती घेणार आहेत.

नवी दिल्ली येथील कृषी भवनात आज कृषी आणि कृषक कल्याण विभागातर्फे सफाई मित्रांच्या प्रभागांसाठी “स्वच्छता” या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कृषी आणि कृषक कल्याण विभागाचे सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी आणि विभागाच्या अतिरिक्त सचिव शुभा ठाकूर हे मान्यवर उपस्थित होते. या चित्रकला स्पर्धेत 60 पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेतला.

   

पेयजल आणि स्वच्छता विभाग तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकाराने ‘स्वच्छता ही सेवा- 2024’ (SHS, 2024) मोहीम 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 'स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता' या संकल्पनेसह राबवली जात आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2024 रोजी ‘स्वच्छ भारत’ दिवस साजरा केला जाणार आहे.

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2057300) Visitor Counter : 53


Read this release in: Odia , English , Urdu , Hindi , Tamil