माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारत पुढील वर्षाच्या सुरुवातीला माध्यम आणि मनोरंजन विश्वाचा संपूर्ण पट उलगडणाऱ्या विश्व दृक्श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे भूषवणार यजमानपद
वेव्ह्ज भारताला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एक अतुलनीय जागतिक बलस्थान म्हणून दर्जा देईल असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांचे प्रतिपादन
'क्रिएट इन इंडिया' या वेव्ह्ज च्या आव्हान पर्व 1 ची सुरुवात झाली असून यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जाजू यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
20 SEP 2024 8:00PM
|
Location:
PIB Mumbai
हैद्राबाद, 20 सप्टेंबर 2024
भारताच्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला चालना देण्यासाठी आणि त्याचा जागतिक प्रभाव वाढवण्यासाठी भारत सरकार पुढील वर्षाच्या सुरुवातीला 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान विश्व दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्ह्ज) आयोजनासाठी सज्ज होत आहे.

हैदराबाद शहरातील जवाहरलाल नेहरू स्थापत्य आणि ललित कला विद्यापीठात (जेएनएएफएयु) आज वेव्ह्ज ला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या रोड शोमध्ये बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले की, वेव्ह्ज ही माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचा संपूर्ण पट उलगडून दाखवणारी पहिली जागतिक शिखर परिषद असेल. या कार्यक्रमात भाग घेताना, तेलंगणा सरकारच्या आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाचे विशेष मुख्य सचिव जयेश रंजन म्हणाले की या क्षेत्रातील अभिनवतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याकडे एक विशेष आखलेली परिसंस्था आहे आणि ती राष्ट्रीय स्तरावर नेण्यास आनंद होईल.
माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू हैदराबाद येथे वेव्ह्ज शिखर परिषदेविषयी माहिती देताना वेव्ह्ज मध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योग आणि तंत्रज्ञान यांच्यातील समन्वित प्रयत्न अनुभवता येतील, असे सांगितले. उदयोन्मुख माध्यम आणि मनोरंजन उद्योग क्षेत्रात संवाद, व्यापार सहयोग आणि नवोन्मेषाला चालना देणारा प्रमुख मंच बनण्याचे वेव्ह्ज चे उद्दिष्ट आहे. संधींचा धांडोळा घेऊन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, भारताकडे व्यापार आकर्षित करण्यासाठी आणि या क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्याकरिता उद्योग धुरीण, हितधारक आणि नवोन्मेषकारांना या परिषदेत आमंत्रित केले जाईल.

सकाळी माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी चित्रपट संघटना आणि एव्हीजीसी क्षेत्रातील उद्योग धुरिणींची भेट घेतली. हैदराबादच्या सीबीएफसी प्रादेशिक कार्यालयाने आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी चित्रपट उद्योगात होणाऱ्या पायरसीच्या विरोधात दंडात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. गेमिंग उद्योगातील हितधारकांना सरकारकडून मदत करण्याचे आश्वासनही जाजू यांनी दिले.

भारतातील निर्मिती आव्हान पर्व-1
चित्रपट संघटना आणि एव्हीएजी क्षेत्रातील हितधारकांच्या बैठकीत संजय जाजू आणि जयेश रंजन यांचे संबोधन
एनएफडीसी चे महाव्यवस्थापक आणि वेव्ह्ज चे सीईओ अजय ढोके आणि सीबीएफसी चे सीईओ राजेंद्र सिंह, हैदराबादच्या सीबीएफसी च्या आरओ शिफाली कुमार आणि ईओ राहुल गोवळीकर या बैठकीत सहभागी झाले होते.
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
रिलीज़ आईडी:
2057182
| Visitor Counter:
83