पंचायती राज मंत्रालय
पंचायती राज मंत्रालय, 8 व्या भारत जल सप्ताहात भागीदार मंत्रालय म्हणून होणार सहभागी
Posted On:
16 SEP 2024 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024
पंचायती राज मंत्रालय 17 ते 20 सप्टेंबर 2024 दरम्यान भारत मंडपम, हॉल क्रमांक 12A, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित 8 व्या भारत जल सप्ताह आणि प्रदर्शनात भागीदार मंत्रालय म्हणून सहभागी होणार आहे. “समावेशक जल विकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी आणि सहकार्य” ही संकल्पना ग्रामीण भारतातील शाश्वत जल पद्धतींना पुढे नेण्यासाठी पंचायती राज मंत्रालयाच्या वचनबद्धतेशी संरेखित आहे ज्यासाठी मंत्रालय संसाधनांच्या एककेंद्राभिमुखतेतून लक्ष्यित पंचायत विकास योजनांद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जल समृद्ध गावांना प्रोत्साहन देत आहे.
जलसंधारण, पावसाचे पाणी साठवण, भूजल पुनर्भरण, पाणी वितरण, पाणी वितरणातील रेशनिंग इत्यादीपासून देशभरातील ग्रामपंचायतींच्या जल व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धती मंत्रालयाचा प्रदर्शन स्टॉल प्रदर्शित करणार आहे.
याशिवाय, हिवरे बाजार (जिल्हा – अहमदनगर, महाराष्ट्र), बाजारवाडा (जिल्हा – वर्धा, महाराष्ट्र), आणि खुर्सापार (जिल्हा – नागपूर, महाराष्ट्र) यांसारख्या देशभरातील इतर ग्रामपंचायतींनी जलसंधारण आणि व्यवस्थापनासाठी केलेल्या सामुदायिक प्रयत्नांवरही प्रकाश टाकला जाणार आहे.
‘जल समृद्ध पंचायत’ संकल्पना ही शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (LSDGs) स्थानिकीकरणाच्या नऊ संकल्पनांपैकी एक आहे. स्वच्छ पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आणि शाश्वत पाणी व्यवस्थापन स्वीकारणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
8वा भारत जल सप्ताह सर्व भागधारकांना या मिशनमध्ये गुंतवून ठेवण्याची उत्तम संधी प्रदान करतो. शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (LSDGs) जल समृद्ध पंचायत संकल्पने अंतर्गत विशेष कामगिरी करणाऱ्या पंचायतींचे प्रतिनिधी 8 व्या भारत जल सप्ताहात प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत.
8व्या भारत जल सप्ताहादरम्यान, जल क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींवरील एक संकल्पनात्मक सत्र संपूर्ण भारतातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचो यशस्वी उपक्रमांवर प्रकाश टाकेल. या सत्राचे उद्दिष्ट आंतर राज्यीय सहकार्याला चालना देणे आणि देशभरातील पाण्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सगळीकडे वापरता येईल असे प्रारुप अधोरेखित करणे हे आहे.
Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055376)
Visitor Counter : 56