उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती 14-15 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्राला भेट देणार
मुंबईत एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 15 सप्टेंबरला उपराष्ट्रपती करणार संविधान मंदिराचे उद्घाटन
15 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती नागपूरमध्ये रामदेवबाबा विद्यापीठात करणार डिजिटल टॉवरचे उद्घाटन
Posted On:
13 SEP 2024 7:42PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 14-15 सप्टेंबर 2024 ला महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार असून ते या दौऱ्यात मुंबई आणि नागपूरला भेट देणार आहेत.
मुंबईत 15 सप्टेंबरला उपराष्ट्रपती जगदीप धनखड एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान मंदिराच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या कार्यक्रमानंतर ते त्याच दिवशी नागपूरला प्रयाण करतील. नागपूरमध्ये ते रामदेवबाबा विद्यापीठात डिजिटल टॉवरचे उद्घाटन करतील.
14 सप्टेंबरला मुंबईत आगमन झाल्यावर उपराष्ट्रपती मुंबईत राजभवनला देखील भेट देणार आहेत.
***
S.Kakade/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054793)
Visitor Counter : 89