संरक्षण मंत्रालय
सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी जल-थल अभियानांसाठी संयुक्त सिद्धांत केला जारी
Posted On:
09 SEP 2024 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2024
एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी नवी दिल्ली येथे 9 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी (COSC) च्या बैठकीत जल-थल अभियानांसाठी संयुक्त सिद्धांत जारी केला. हा सिद्धांत हे एक प्रमुख प्रकाशन आहे जे आजच्या जटिल लष्करी वातावरणात जल-थल मोहिमांच्या संचालनासाठी मार्गदर्शन करेल.
जल-थल क्षमता सशस्त्र दलांना युद्ध आणि शांतता या दोन्ही काळात हिंदी महासागर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवण्यास सक्षम बनवते. बहु -क्षेत्रीय अभियानांसाठी अशा मोहीमा एक महत्त्वाचा घटक असून सशस्त्र दलांमधील समन्वय आणि एकात्मतेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून काम करते.
सायबरस्पेस मोहिमांसाठी संयुक्त सिद्धांत जारी केल्यानंतर, जल-थल सैन्य अभियानांसाठी जारी केलेले संयुक्त सिद्धांत हे या वर्षी जारी केलेले दुसरे संयुक्त सिद्धांत आहेत आणि ते साधारणपणे सशस्त्र दलांच्या संयुक्तता आणि एकात्मतेवर आणि विशेषतः जल-थल मोहिमांवर योग्य लक्ष केंद्रित करते.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2053176)
Visitor Counter : 57