संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता :संरक्षण मंत्रालयाने Su-30MKI विमानांसाठी 240 AL-31FP एअरो इंजिन्ससाठी एचएएल सोबत 26,000 कोटी रुपयांच्या करारावर केली स्वाक्षरी

Posted On: 09 SEP 2024 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2024

आत्मनिर्भर भारत होण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना देण्याकरिता, संरक्षण मंत्रालयाने Su-30MKI विमानांसाठी 240 AL-31FP एअरो इंजिनसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल ) बरोबर  26,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. 9 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत संरक्षण सचिव  गिरीधर अरमाने आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि एचएएल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

एचएएलच्या कोरापुट विभागाद्वारे ही एअरो इंजिन तयार केली जातील आणि देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी Su-30 ताफ्याची परिचालन क्षमता कायम राखण्याची भारतीय हवाई दलाची गरज पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.करारातील वितरण वेळापत्रकानुसार एचएएल दरवर्षी 30 एअरो -इंजिन्सचा पुरवठा  करेल. सर्व 240 इंजिनांचा पुरवठा पुढील आठ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल.

निर्मिती दरम्यान,एमएसएमई  आणि सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांचा समावेश असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादन परिसंस्थेची मदत घेण्याचा एचएएलचा विचार आहे.वितरण कार्यक्रमाच्या समाप्तीपर्यंत, एचएएल स्वदेशी सामग्री 63% पर्यंत वाढवून सरासरी 54% पेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य करेल.यामुळे एअरो -इंजिनांच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमधील  स्वदेशी सामग्री वाढवण्यात देखील मदत होईल.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2053122) Visitor Counter : 89