कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या नवी दिल्ली येथे ऍग्रीशुअर फंड आणि कृषी निवेश पोर्टलचा करणार प्रारंभ तसेच ग्रीनथॉन एआयएफ उत्कृष्टता पुरस्कार करणार प्रदान
Posted On:
02 SEP 2024 3:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2024
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या नवी दिल्लीतील पुसा येथे ऍग्रीशुअर फंड आणि कृषी निवेश पोर्टलचा प्रारंभ करतील. कृषी निवेश पोर्टलचा प्रारंभ करण्यासोबतच शिवराज सिंह विविध श्रेणींमध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या बँका आणि राज्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा म्हणून कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ ) उत्कृष्टता पुरस्कारही प्रदान करतील. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी आणि राम नाथ ठाकूर देखील उपस्थित राहणार आहेत.
हा पुरस्कार सोहळा इतर बँकांना त्यांची कामगिरी अधिक उज्ज्वल करण्यासाठी प्रेरणा देईल, जेणेकरून कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या एकूण यशात भर पडेल. पुरस्कार सोहळ्यात विविध राज्ये आणि बँकांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
पीक काढणीपश्चात व्यवस्थापन पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेती मालमत्तेच्या निर्मितीसाठी कृषी पायाभूत सुविधा निधी योजना 2020 मध्ये सुरू करण्यात आली.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2050848)
Visitor Counter : 73