राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती 2 ते 4 सप्टेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर

Posted On: 01 SEP 2024 7:27PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 ते 4 सप्टेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्राला भेट देणार आहेत.

2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती कोल्हापूर मधील वारणानगर येथे वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला उपस्थित राहतील.

3 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विदयापीठ) विद्यापीठाच्या 21 व्या दीक्षांत समारंभात उपस्थित राहतील आणि संबोधित देखील करतील. त्याच दिवशी त्या मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला उपस्थित राहतील.

4 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती उदगीर, लातूर येथे बुद्ध विहाराचे उद्घाटन करतील.  उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला त्या संबोधित करतील.

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2050700) Visitor Counter : 65


Read this release in: English , Urdu , Hindi