दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक साजरा करत आहे  7 वा वर्धापन दिन : आर्थिक समावेशनाच्या प्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार

Posted On: 01 SEP 2024 2:40PM by PIB Mumbai

 

देशभरात आर्थिक समावेशनाला चालना देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारी इंडिया  पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) आज आपला 7वा वर्धापन दिवस साजरा करत आहे. 2018 मध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रव्यापी स्तरावर प्रारंभ केल्यापासून आयपीपीबी ने कमी सेवा मिळणाऱ्या आणि बँकिंग सेवांपासून वंचित कुटुंबांना त्यांच्या दारात  सुलभ, किफायतशीर आणि विश्वासार्ह डिजिटल बँकिंग सेवा पुरवून भारताच्या आर्थिक परिदृश्यात  बदल घडवून आणला आहे.

गेल्या सात वर्षांत आयपीपीबी ने देशभरातील आर्थिक समावेशनातील तफावत दूर करण्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या  1,61,000 हून अधिक टपाल कार्यालये आणि 1,90,000 टपाल  कर्मचार्‍यांच्या व्यापक जाळ्याचा लाभ घेत लक्षणीय प्रगती केली आहे. आयपीपीबी च्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने , विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील लाखो लोकांना आवश्यक बँकिंग सेवा मिळतील हे सुनिश्चित केले आणि  प्रत्येक कुटुंबाला  डिजिटल बँकिंग सेवा पुरवून देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान दिले आहे.

इंडिया  पोस्ट पेमेंट्स  बँकेची  प्रमुख कामगिरी:

• 9.88 कोटी ग्राहकांची  खाती सुरू केली.

• 12 लाखाहून अधिक व्यापाऱ्यांना सामावून घेतले .

विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण  अंतर्गत 45,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम यशस्वीरित्या वितरित केली.

• 7.10 कोटी ग्राहकांना आधार कार्डबरोबर मोबाइल नंबर अद्यतनित करण्याची सुविधा दिली.

• 20 लाखाहून अधिक पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा सक्षम केली.

दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, “भारताच्या वंचित समुदायांना सक्षम करण्याचा सात वर्षांचा प्रवास साजरा करताना आयपीपीबी ने आजपर्यंत केलेल्या प्रभावी  कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. आमचे ध्येय कायम आहे - भारतातील प्रत्येक कुटुंबापर्यंत विशेषत: ईशान्य भागासह, सर्वात दुर्गम भागापर्यंत  बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे. आर्थिक समावेशनाच्या दिशेने आमची वाटचाल नव्या जोमाने आणि नवकल्पनांसह सुरू ठेवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2050616) Visitor Counter : 85